esakal | Pune : खरा समाजवाद आणण्यासाठी सहकार हाच एकमेव मार्ग; किरण ठाकूर
sakal

बोलून बातमी शोधा

Kiran Thakur

खरा समाजवाद आणण्यासाठी सहकार हाच एकमेव मार्ग; किरण ठाकूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात खरा समाजवाद आणायचा असेल तर सहकार वाढवणे हा एकमेव मार्ग आहे. सहकार वाढविण्यांसाठी सहकारी संस्थांवरील निर्बंध हटविणे गरजेचे आहे. निर्बंध हटविल्यास सहकारी संस्था अन्य बँकापेक्षा अर्थिकदृष्ट्या मजबूत होतील. मात्र, याकडे दुर्लक्ष करून सहकाराला सध्या बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची खंत लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी रविवारी (ता. ०३) येथे व्यक्त केली.

सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने आयोजित सहकार महापरिषदेत ते बोलत होते. ठाकूर म्हणाले, 'राज्यातील सहकार वाढविण्यासाठी विठ्ठलराव विखे-पाटील, तात्यासाहेब कोरे, शंकरराव मोहिते-पाटील, वैकुंठभाई मेहता, धनंजयराव गाडगीळ आणि वसंतदादा पाटील या दिग्गज नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या या मेहनत आणि प्रयत्नांमुळेच राज्यात आजही सहकार चळवळ टिकून आहे. या दिग्गजांनी सहकारमहर्षी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली'.

हेही वाचा: संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम शेतक-यांनी बंद पाडले

लोकमान्य सोसायटीची यशोगाथा सांगताना ते म्हणाले, 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. ही घोषणा लोकमान्य टिळकांनी बेळगाव येथे केली. ज्या ठिकाणी त्यांनी ही घोषणा केली. ते म्हणजे पूर्वश्रमीचे ठळकवाडी होय. पुढे आम्ही या 'ठळकवाडी'चे नामांतर टिळकवाडी केले. याच टिळकवाडीत लोकमान्य मल्टिपर्पजची स्थापना १९९५ला केली. लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेमुळेच आम्ही या नागरी सोसायटीला लोकमान्य हे नाव दिले. माझे वडील बाबुराव ठाकूर हे लोकमान्यांचे अनुयायी होते.'

लोकमान्य टिळक असताना देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही. पण, लोकमान्यांनी स्वातंत्र्याच्या जवळ आणले. त्यांनी स्वराज्य, स्वदेशी ही चळवळ सुरु केली. त्यामुळे को-ऑपरेटिव्हचे खरे जनक हे लोकमान्य आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्य घडवू असे टिळक सांगायचे. ते त्यांच्याकडून होऊ शकले नाही. परंतु, त्याची सुरवात आम्ही केली आहे. बँकेच्या पहिल्या दिवसांपासून अत्याधुनिक सुरवात केली. ज्यावेळी राष्ट्रीयकृत बँकामध्ये संगणक नसायचे त्यावेळी आम्ही कामाची सुरवात संगणकावर केली. बँकेत ७५ टक्के महिला काम करत आहेत. सध्या बँकेच्या देशातील ४ राज्यात २१३ शाखा असून १० लाख ग्राहक आहेत. सुरक्षितता, विश्वासार्हता, पारदर्शकता, व्यावसायिकता या चुतुःश्रुतीवर आम्ही काम करत असल्याचेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले. बँकानी निकोप दृष्टिकोनातून आणि लोकाभिमुख काम केले पाहिजे. आम्हाला जे काही यश मिळाले आहे त्यात अनेकांनी मार्गदर्शन केल्याचे ठाकूर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

loading image
go to top