esakal | Pune : सहकारी बँकांनी बलस्थानांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

bank

सहकारी बँकांनी बलस्थानांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सहकार क्षेत्राचा सगळ्यात मोठा आधार असलेल्या कृषि क्षेत्राचे प्रमाण कमी होत आहे. याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. वितरण व्यवस्था हे सहकार क्षेत्राचे बलस्थान असून ग्राहकांना काय हवं. त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे मत सॉलिटिअर रिअल इस्टेट ग्रुपचे संचालक पंकज ओझा यांनी व्यक्त केले.

ते सकाळच्या सहकार महापरिषदेत सहकार क्षेत्रातील नवीन संधी या विषयांवर बोलत होते. ओझा म्हणाले, 'सहकारी बँकांची स्थापना रिझर्व्ह बँकेच्या आधी झालेली आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सहकारी बँकांमध्ये तोटा वाढला असून त्याचा परिणाम ठेवींवर होत आहे. मागील १० वर्षात १३ टक्के ठेवी कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर, गैरव्यवहारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सहकारी बँकांना फिनटेकचे सर्वात मोठे आव्हान आहे. सहकार क्षेत्राला कृषी क्षेत्राचा सर्वात मोठा आधार होता, मात्र गेल्या काही वर्षांपासून तो कमी होत आहे. सहकारी बँकाचा गाभाच कमी होत आहे, यावर विचार झाला पाहिजे.

ते म्हणाले, रिझर्व्ह बँकेकडून वारंवार नवीन सूचना येत आहेत. या अर्थिक वर्षात लक्षणीय ती संख्या जास्त वाढली आहे. त्यावरून रिझर्व्ह बँकेचे काय धोरण आहे हे स्पष्ट होते. जनधन योजना, मुद्रा योजना यांचाही सहकारी बँकांच्या व्यवसायांवर परिणाम होत आहे. वितरण व्यवस्था ही नागरी सहकारी बँकांचे बलस्थान आहे. राष्ट्रयीकृत बँकाचे कामकाज जिथे थांबते, तिथून सहकारी बँकांचे काम सुरु होते. ग्राहकांना कोणत्या प्रकारची सेवा पाहिजे, याचा सहकारी बँकांनी विचार करावा आणि ती देण्यासाठी प्रयत्नशील राहावे. सहकारी बँकांनी नाविण्यपूर्ण संकल्पना राबवून व्यवसाय वृद्धी करण्याची गरज आहे. नवीन संधीचा शोध घेत असताना महा ट्रेड मार्केट (एमटीएम) आणि सहकारी बँका एकत्रितरित्या काम करु शकतात. चांगल्या संकल्पना घेऊन त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे.

loading image
go to top