खेडमधील शाळांना ५१ हजार पुस्तकांचे वाटप

खेडमधील शाळांना ५१ हजार पुस्तकांचे वाटप

Published on

चाकण, ता. ३ : खेड तालुक्यातील अग्रगण्य श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त, तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खेड तालुक्यातील विविध शाळांना स्वातंत्र्यसेनानी, संत व महापुरुषांवरील एकूण ५१ हजार पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, संस्कार, इतिहासाची जाणीव आणि प्रेरणादायी विचार रुजावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला, अशी माहिती संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष शिवाजीराव गवारे यांनी दिली. हा उपक्रम संस्थेचे संस्थापक संभाजी गवारे यांच्या मार्गदर्शनातून, तसेच संस्थापक अध्यक्ष गवारे यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या सर्व शाखांचे संचालक, सल्लागार मंडळ व कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. पुस्तक वाटप कार्यक्रमास शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. श्री समर्थ पतसंस्थेचा हा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास्पद ठरला. शिक्षण व संस्कार क्षेत्रात संस्थेचे योगदान उल्लेखनीय असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
रौप्य महोत्सव वर्षानिमित्त भविष्यातही असेच सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संस्थेचा मानस असल्याचे यावेळी अध्यक्ष गवारे यांनी सांगितले.

10106

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com