

माले, ता. ८ : आंबवणे (ता. मुळशी) येथील शेतकरी मनोहर खंडू वाळंज यांच्या शेतातील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपये किमतीची कॉपर केबल चोरून नेली. ही घटना २८ जुलै रोजी घडली असून, वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
वाळंज यांची गट क्रमांक २०८ व ३०९ मध्ये बागायती शेती असून तेथे हॉटेलचे बांधकामही सुरू आहे. २०१७ मध्ये बोअरवेल पंप आणि २०२३ मध्येही त्यांच्या शेतातील केबल चोरीला गेली होती. आता पुन्हा तीन कोअर कॉपर केबल चोरीला गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. स्थानिक व्यक्ती आणि भंगार व्यावसायिकांच्या संगनमताने या चोऱ्या होत असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी वाळंज व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
आंआं
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.