Narayangaon News : कोथिंबीर, मेथीला सोन्याचा भाव; उत्पादकांचे नशीब उजळले

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. आवक घटल्याने बाजारभावात मोठी वाढ झाली.
Sanjay Thite Bill

Sanjay Thite Bill

sakal

Updated on

नारायणगाव - जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात सोमवारी (ता. 13) रात्री झालेल्या लिलावात चांगल्या प्रतीच्या कोथिंबीर जुडीला शेकडा आठ हजार पाचशे रुपये (85 रुपये जुडी) मेथीच्या जुडीला शेकडा चार हजार दोनशे (42 रुपये जुडी) शेपूच्या जुडीला शेकडा तीन हजार सहाशे रुपये (36 रुपये जुडी) असा उचांकी भाव मिळाला. मागील वर्षभरात प्रथमच अल्पमुदतीच्या व कमी भांडवलाच्या या पिकापासून एकरी एक ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कोथिंबीर, मेथीला सोन्याचा भाव मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर हसू फुलले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com