मुळशीत आणखी एका महिलेला कोरोना

corona
corona
Updated on

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्यातील सूस येथील एका पस्तीस वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  

सूसमधील एका गृहनिर्माण संस्थेच्या फ्लॅटमध्ये ही महिला पती व मुलीसह वास्तव्यास आहे. काल या महिलेचा अहवाल मिळताच तिला पुणे येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महिलेला कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती. मात्र, अहवाल सकारात्मक आल्याने तिला रुग्णालयात दाखल केले आहे. 

या महिलेला एक सहा महिन्याची मुलगी असून, त्या मुलीचा व पतीचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे पती व मुलगी राहत्या घरातच विलागिकरण करून आहेत. ही महिला पतीसह मुंबई येथील तिच्या माहेरी भावाकडे गेली होती, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अजित कारंजकर यांनी दिली.

दरम्यान,  भूगाव (ता. मुळशी) येथील कोरोनाबाधिताच्या मुलगा आणि मुलीचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच, आंबवणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्यासही कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. 

नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार अभय चव्हाण व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अजित  कारंजकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com