खासगी रुग्णालयांतही सुरू होणार करोना विलगीकरण कक्ष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

येत्या दहा ते बारा दिवसांत खासगी रुग्णालयात करोनाच्या तपासणीसाठी विलगीकरण कक्ष सुरू होतील, अशी माहिती पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे : करोना संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शहरातील खासगी रुग्णालयांकडून महापालिकेला आला आहे. त्याचा दोन दिवसांत पाठपुरावा पूर्ण होईल. त्यामुळे येत्या दहा ते बारा दिवसांत खासगी रुग्णालयात करोनाच्या तपासणीसाठी विलगीकरण कक्ष सुरू होतील, अशी माहिती पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सोसायटी ऑफ मेडिकल इमर्जन्सीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप, जनरल प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. संगीत खेनट, शिवणे डॉक्‍टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र कदम, डॉ. विजय वारद यावेळी उपस्थित होते.

दिल्लीतील शाळांना मेलेनिया ट्रम्प यांनी दिली भेट; म्हणाल्या...

डॉ. वावरे म्हणाले, शहरातील दहा ते बारा खासगी रुग्णालयांकडून विलगीकरण कक्ष सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेला देण्यात आला आहे. संबंधित हॉस्पिटल्समध्ये असणाऱ्या सुविधांची तपासणी लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर तेथे विलगीकरण कक्ष सुरू होतील. या रुग्णालयांमध्ये असलेले विलगीकरण कक्ष आणि व्हेंटिलेटर्सची संख्या वेगवेगळी असू शकते. तसेच पुणे महापालिका आणि फॅकल्टी ऑफ डिझास्टर मेडिसिनतर्फे कार्यशाळेच्या माध्यमातून शहरातील जनरल प्रॅक्‍टिशनर्सना करोनाबाबत माहिती दिली जाणार आहे. आत्तापर्यंत 90 प्रॅक्‍टिशनर्सना याबाबत माहिती दिली असून, उर्वरित प्रॅक्‍टिशनर्सना टप्प्या-टप्प्यात माहिती दिली जाणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे त्या पक्षाचा 'हा' मराठी माणूस आहे अध्यक्ष

करोनाबाबत भीती बाळगण्याचे कारण नाही ः
करोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जे नागरिक व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूर आणि चीनमधून प्रवास करून आले असतील आणि त्यांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास त्यांची संशयित म्हणून तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. नागरिकांनी स्वच्छतेचे नियम पाळावेत, अन्नपदार्थ पूर्ण शिजवून खावेत. या बाबत महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येत असल्याचे देखील डॉ. वावरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona detachment cell will also be started in private hospitals

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: