esakal | दिल्लीतील शाळांना मेलेनिया ट्रम्प यांनी दिली भेट; म्हणाल्या...

बोलून बातमी शोधा

Its a Beautiful School Melania Trump Visits Delhi Govt School

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका, जावई जेअर्ड कुशनर हे देखील भारत दौऱ्यावर आलेले आहेत. यावेळी मेलेनिया ट्रम्प यांनी दिल्लीतील नानकपुरा येथील सर्वोदय सेकंडरी स्कूलला भेट दिली व हॅपीनेस क्लासचीही पाहणी केली.

दिल्लीतील शाळांना मेलेनिया ट्रम्प यांनी दिली भेट; म्हणाल्या...
sakal_logo
By
वृत्तसेवा

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका, जावई जेअर्ड कुशनर हे देखील भारत दौऱ्यावर आलेले आहेत. यावेळी मेलेनिया ट्रम्प यांनी दिल्लीतील नानकपुरा येथील सर्वोदय सेकंडरी स्कूलला भेट दिली व हॅपीनेस क्लासचीही पाहणी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी विद्यार्थ्यांनी मेलेनिया यांचे पारंपरिक वेशभूषेत औक्षण करून स्वागत केलं. मेलेनिया विद्यार्थ्यांबरोबर वेळ घालवत आहेत. शिवाय, येथील विद्यार्थी कशाप्रकारे हसतखेळत शिक्षण घेत आहेत, हे देखील त्या जाणून घेत आहेत. याप्रसंगी शाळेतील शिक्षिकांनी त्यांना याबद्दल माहिती देखील दिली. मेलेनिया शाळेस भेट देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वर्ग खोल्यांसह शाळेची सुंदर सजावट करण्यात आली होती. वर्गातील फळ्यावर मेलानिया यांच्या स्वागताचा संदेश लिहिण्यात आला होता. यावेळी मेलेनिया यांनी विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला.

मलेनिया यांनी नमस्ते म्हणत शाळा खूप सुंदर असल्याचे सांगितले. तसेच, त्यांचे स्वागत पारंपरिक वेशभूषेत केल्याने त्या भारावून गेल्या. त्याबद्दल त्यांनी आभारही मानले. ही त्यांचा पहिला भारत दौरा असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिक्षकांनी मुलांनी बनवलेले एक छान पेटिंग मेलोनिया यांना गिफ्ट केले.

डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे त्या पक्षाचा 'हा' मराठी माणूस आहे अध्यक्ष

तत्पूर्वी, मेलानिया यांनी शाळेला भेट देण्यापूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून दिल्लीकरांचे अभिनंदन केले होते. अमेरिकेच्या प्रथम महिला दिल्लीतील सरकारी शाळेला भेट देत आहेत याचा आनंद आहे. आमच्या शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि दिल्लीकरांसाठी आजचा दिवस खास आहे. अनेक वर्षांपासून भारत जगाला आध्यात्मिकता शिकवत आहे. आमच्या शाळेतून मेलानिया काही तरी संदेश घेऊन जातील, असा विश्वास केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केला आहे.

दरम्यान, काल आल्यानंतर सर्वप्रथम साबरमती आश्रमास त्यांनी भेट दिली. यानंतर मोटेरा स्टेडियममधील नमस्ते ट्रम्प कार्यक्रमास हजेरी लावली. हा कार्यक्रम आटोपून ते आग्रा येथे ताजमहल पाहण्यास गेले होते. आज सकाळी ट्रम्प महात्मा गांधीजींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावर गेले होते.