मुळशीतील या 19 गावांची कोरोनावर मात 

corona
corona
Updated on

पौड (पुणे) : मुळशी तालुक्यातील 41 गावांमध्ये कोरोनाने विळखा घातला असला, तरी त्यातील 19 गावे शंभर टक्के कोरोनामुक्तही झाली आहे. 763 पैकी 606 जणांनी कोरोनावर मात केली असून, 134 जणांवर विविध ठिकाणी उपचार चालू आहेत. मात्र, आतापर्यंत 23 जणांचा बळीही या आजाराने घेतला आहे. 

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ
    
मुळशी तालुक्यात 16 मेपासून कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरूवात झाली. जुलै महिन्यात तर कोरोनाने कहरच केला. असे असतानाही काही ठिकाणी मुळशीकरांची बेपर्वाई पहायला मिळाली. मास्क न घालता फिरणे, सोशल डिस्टन्स न ठेवणे, बिनकामाचे बाहेर फिरणे यामुळे काही परिवारांनाही त्याची लागण झाली. पूर्व पट्ट्यासह पश्चिम पट्ट्यातील दुर्गम गावातही कोरोना पोचला. आतापर्यंत तालुक्यातील 41 गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. 

तालुक्यात आतापर्यंत 763 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 606 जण विविध दवाखान्यात उपचार घेऊन बरेही झाले 
आहेत. तर, सध्या 134 जणांवर उपचार चालू आहेत. तर, मारूंजी, नांदे, भूगाव, सूस, हिंजवडी, भुकूम, बावधन, करमोळी, हाडशी येथील प्रत्येकी एक जण, पिरंगुट, कासारआंबोली, लवळे, पौड येथे प्रत्येकी दोन आणि जांबे, म्हाळुंग्यात प्रत्येकी तीन, अशा 23 जणांचा मृत्यू झाला.

तालुक्यातील कोरोनामुक्त झालेल्या गावांची नावे व कंसात बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे : नांदगाव (1), माळेगाव (2), उरवडे (17), चाले (5), करमोळी (2), कुळे (4), अकोले (2), बोतरवाडी (7), माले (3), भरे (1), पौड (11), मुळशी खुर्द (2), खुबवली (2), आडमाळ (2), हाडशी (6), मारणेवाडी (1), मुलखेड (1), मुठा (1), शेरे (1).
    
तालुक्यातील विविध गावांतील रूग्णांची संख्या व कंसात अॅक्टिव रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे : मारूंजी 33 (4), नांदे 19 (2), पिरंगुट 62 (18), भूगाव 68 (8), सूस 71 (8), हिंजवडी 71 (29), भुकूम 17 (1), कासारआंबोली 34 (4), अंबडवेट 10 (2), घोटावडे 27 (3), लवळे 29 (1), बावधन 59 (6), माण 51 (8), जांबे 35 (11), कासारसाई 15 (9), म्हाळुंगे 38 (5), नेरे 25 (4), दारवली 15 (1), रिहे 6 (3), दखणे 1 (1), जवळ 1 (1), चांदे 5 (5).

कंपन्यांमध्ये धोका
मुळशी तालुक्यातील अनेक गावांतील ग्रामस्थांनी संयम दाखवित कोरोनाचा अटकाव केला. 19 गावे कोरोनामुक्तही झाली. सध्या 
कारखानदारी सुरू आहे. या कारखान्यांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड तसेच तालुक्यातील कामगार कामाला जातात. परंत, येथे कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी राबावयाच्या उपाययोजना कागदोपत्रीच दिसत आहे. त्यामुळेच अनेक कारखान्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कंपन्यांमध्ये कामगाराच्या सोशल डिस्टन्सबाबत कंपनी प्रशासनाची कमालीचा कानाडोळा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कोरोनाचा अटकाव केला असला, तरी कामगारांच्या माध्यमातून गावामध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची खबरदारी कंपनी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com