अरे वा, दौंडमध्ये अर्ध्या तासातच मिळणार कोरोनाचा रिपोर्ट 

प्रफुल्ल भंडारी
Wednesday, 5 August 2020

दौंड उप जिल्हा रूग्णालयात तातडीने कोरोनाचे निदान करण्यासाठी रॅपिड अँटिजेन डिटेक्शन किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अॅंटिजेन किटद्वारे जागेवरच कोरोना आजाराचे सरासरी अर्धा तासात निदान करणे शक्य होणार आहे.

दौंड (पुणे) : दौंड उप जिल्हा रूग्णालयात तातडीने कोरोनाचे निदान करण्यासाठी रॅपिड अँटिजेन डिटेक्शन किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अॅंटिजेन किटद्वारे जागेवरच कोरोना आजाराचे सरासरी अर्धा तासात निदान करणे शक्य होणार आहे.

आॅनलाइनचा नवा फिटनेस फंडा

दौंड शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये सध्या रूग्णांच्या घशातील स्त्राव घेऊन तपासणीसाठी (स्वॅब टेस्ट) पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्याचा अहवाल येण्यास २४ ते ३० तास लागत आहेत. परंतु, ज्यांची प्रकृती खालावलेली आहे, अशा संशयित रूग्णांवरील पुढील उपचार कोरोना निदान चाचणीच्या अहवालाशिवाय सुसह्य होत नसल्याने उप जिल्हा रूग्णालयाने रॅपिड अँटिजेन डिटेक्शन किटची मागणी केली होती. त्याप्रमाणे १०० किट उपलब्ध झाल्याची माहिती उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. 

पुण्यात रेल्वेे, विमान, रिक्षा, कॅबला परवानगी, पण पीएमपीला

अँटिजेन डिटेक्शन म्हणजे काय?
अँटिजेन म्हणजे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये मिसळलेला परदेशी पदार्थ/घटक असतो. कोरोना विषाणूमध्ये हा परदेशी घटक आढळतो. रॅपिड अँटिजेन डिटेक्शन या तपासणीमध्ये संशयित रुग्णाच्या नाकातून स्त्रावाचा नमुना घेऊन अँटिजेन शोधण्यात येतो. त्याकरिता प्रयोगशाळा किंवा यंत्राची आवश्यकता भासत नाही. स्त्रावाचा नमूना घेतल्यानंतर साधारणपणे ३० मिनिटात संशयित रूग्णाचा कोरोना अहवाल येतो. 
       
आणखी सात जण पॅाझिटिव्ह
दौंड शहरात ५ आॅगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार ४ स्त्री व गोपाळवाडी (ता. दौंड) येथील एका पुरूषाचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. बाधितांचे वय १४ ते ५८ दरम्यान आहे, अशी माहिती डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. तालुक्याच्या ग्रामीण भागात कुरकुंभ येथील १९ वर्षीय युवक आणि सहजपूर येथील ५३ वर्षीय नागरिक यांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे, अशी माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona disease will be diagnosed in half an hour in Daund