Video : कोरोनामुक्त पोलिसाचे सहकाऱ्यांकडून असे झाले स्वागत...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

- कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले पोलिस कर्मचारी उपचारानंतर बरे होऊन रुग्णालयातून बाहेर.

पुणे : कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले पोलिस कर्मचारी उपचारानंतर बरे होऊन रुग्णालयातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांचे सहकरी व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी 'कर हर मैदान फतेह' म्हणत या कोरोना योध्यावर पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत केले. तर या 'स्पेशल गिफ्ट'ने भारावलेल्या पोलिसालाही आपले आनंदाश्रू रोखता आले नाहीत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहर पोलिस दलातील 22 जणांना आत्तापर्यंत कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यापैकी 9 जण बरे होऊन त्यांच्या घरी परतले. तर दुर्दैवाने दोन पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, पुणे पोलिस दलात पहिल्यांदा शहराच्या मध्यवर्ती भागातील एका पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यास व त्यानंतर याच पोलिस ठाण्यातील 8 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी कोरोना झालेल्या व उपचारानंतर बरे झालेल्या एका पोलिसाला दोन दिवसांपूर्वी सिंबायोसिस रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाशी लढा देऊन सहीसलामत बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्याच्या स्वागतासाठी त्यांचे सर्व पोलिस, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी आवर्जून उपस्थिती लावली. त्यानंतर पोलिसावर सर्वानी पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Free Police Discharged from Hospital in Pune