esakal | Big breaking : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आता...
sakal

बोलून बातमी शोधा

co.jpg

ग्रामीण भागातील पहिला कोरोना रुग्ण १० मार्चला हवेली तालुक्यातील मांजरी येथे सापडला होता. त्यानंतर दुसरा रुग्णही याच तालुक्यातील नांदेड गावात सापडला होता.

Big breaking : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आता...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज (ता. १८) कोरोना रुग्णांचे शतक पुर्ण झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड वगळता केवळ जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील फक्त ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोरोना रुग्णांनी शंभरी पुर्ण केली आहे. मात्र ग्रामीण भागात या रुग्णांचे पहिले शतक पुर्ण होण्यासाठी कोरोनाला तब्बल दोन महिने झगडावे लागले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वाधिक ५२ रूग्ण हे हवेली तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर दुर्गम समजला जाणारा वेल्हे तर, शिरूर तालुका तिसऱ्या स्थानावर आहे. आजघडीला वेल्हे तालुक्यात २२ तर, शिरूर तालुक्यात सात रुग्ण आहेत.

अरे बापरे ! मार्केट यार्डात पुणेकरांची झुंबड; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा       

दरम्यान, जिल्ह्यातील आंबेगाव आणि पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. अन्य तालुक्यातील कोरोना रुग्णांपैकी भोरमध्ये पाच, खेड-४, इंदापूर-३, बारामती व मुळशी प्रत्येकी दोन आणि जुन्नर, दौंड आणि मावळ तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

पुण्यातल्या `त्या` भीती वाटणाऱ्या जागा अन् कीर्ररररर....शांतता!

ग्रामीण भागातील पहिला कोरोना रुग्ण १० मार्चला हवेली तालुक्यातील मांजरी येथे सापडला होता. त्यानंतर दुसरा रुग्णही याच तालुक्यातील नांदेड गावात सापडला होता.

loading image