Video : अरे बापरे ! मार्केट यार्डात पुणेकरांची झुंबड; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

market 1.jpg
market 1.jpg

मार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी मार्केट यार्डातील आठ व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गुळ भुसार विभाग उद्या (मंगळवार) पासून बंद आहे. त्यामुळे या विभागात धान्य आणि किराणा मालाच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाली आहे. कुठेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही.

&

शहरातील आणि जिल्ह्यातील किराणा दुकानदार खरेदीसाठी मार्केट यार्डात आले आहेत. त्यामुळे बाजारात सर्वत्र ट्रॅफिक जाम झाले आहे. बाजारातील व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने व्यापारी आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गुळ-भुसार बाजार मंगळवार (ता. १९) पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

गुळ भुसार बाजार व्यापाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी बंद केला असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. धान्य आणि किराणा मालाचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्राहक, खरेदीदार गर्दी केली होती.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

"गेले दोन महिने भुसार बाजार नियमित सुरु ठेवला आहे. त्यामुळे पुण्यासह शेजारच्या काही जिल्ह्यात अन्नधान्य आणि किराण्याचा पुरवठा सुरळीत सुरु आहे. परंतु, करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तावाल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com