Corona Virus : कोरोनाबाधित अन् संशयितांना आता प्रभागातच करणार क्वॉरंटाईन

Corona infected and suspects will now be quarantined in the ward
Corona infected and suspects will now be quarantined in the ward
Updated on

पुणे : कोरोना बाधित आणि संशयित रुग्णांना आता ते राहत असलेल्या प्रभागातच कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय महापालिकेने घेतला आहे. आतापर्यंत अशा रुग्णांना शहरात अन्य ठिकाणी असलेल्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात होते. परंतु तेथील नागरिक आणि नगरसेवकांच्या त्यास विरोध वाढू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागातील शाळा, मंगल कार्यालय आणि सांस्कृतिक केंद्रांची यादी तयार करण्यात आली आहे. 


'आरोग्य सेतू'ची 'ती' लिंक आली असेल तर सावधान...
कोविड 19 बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्यासाठी महापालिकेकडून सिंहगड रोड, बालेवाडी, रक्षकनगर, सणस गाऊंडसह विविध ठिकाणी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी बाधित रुग्णांबरोबरच त्यांच्या संशयित, तसेच बाधित रुग्णाच्या संपर्क आलेल्या नागरिकांना त्या ठिकाणी नेले जात होते. त्यांची तपासणी करून गरज असेल त्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये तर अन्य नागरिकांना त्याच ठिकाणी क्वॉरंटाईन केले जात होते. त्यासाठी रुग्णांना आणि संशयित रुग्णांना ने-आण करणे, तेथे त्यांची सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावी लागत होती. त्यातून प्रशासनावरील ताण देखील वाढत होता. तसेच क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत होता. दुसरीकडे त्या प्रभागातील नगरसेवकांकडून याला विरोध होत होता. अनेकांनी महापालिका आयुक्तांना भेटून आमच्या प्रभागात ही अडचण नको, असा आग्रह धरणे सुरू केले होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
दरम्यान केंद्र सरकारकडून देखील कोविड- 19 संदर्भात नव्याने काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार तपासणी निगेटिव्ह असलेल्या नागरिक घरी जाण्यास तयार असतील, तर त्यांना पाठवून द्यावे. ज्यांची आरोग्यस्थिती धोकादायक आहे, त्यांना रुग्णालयात, तर जे संशयित आहेत, अशांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने नगरसेवकांचा वाढता विरोध, घरापासून लांबच्या सेंटर जाण्यास नागरिकांचा असलेला विरोध, त्यामुळे प्रशासनावर येणारा ताण विचारात घेऊन आता ज्या प्रभागातील रग्ण अथवा संशयित आढळतील, त्यांना त्याच प्रभागात कोविड केअर सेंटर स्थापन करून तेथेच क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागातील शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालय, सांस्कृतिक केंद्र यांच्या यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. 

पुण्यात अडकलेले विद्यार्थी म्हणताहेत, 'कोरोनाऐवजी आम्ही उपासमारीने मरू'

महापालिकेकडून निश्‍चित करण्यात येणाऱ्या या कोविड केअर सेंटरवर चोवीस तास डॉक्‍टर आणि नर्सेस यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांच्या माध्यमातून या केअर सेंटर मधील संशियत, तसेच बांधित रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत. रूग्णांची आरोग्यस्थिती विचारात घेऊन त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com