हवेली तहसिलदार कार्यालयामधील दोन अधिकाऱ्यांसह आठ जणांना कोरोना संसर्ग

हवेली तहसिलदार कार्यालयामधील दोन अधिकाऱ्यांसह आठ जणांना कोरोना संसर्ग
Updated on

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तहसीलदार कार्यालयातील दोन सर्वोच्च अधिकारी व सहा कर्मचारी असे एकूण आठ जण मंगळवारी (ता. २३) करोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आल्याने हवेली तहसिल कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. तहसिल कार्यालयात एकाच दिवसी तब्बल आठ रुग्ण आढळून आल्याने, कोविड संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी हवेली तहसिल कार्यालय व परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावा अशी मागणी तहसिलदार कार्यालयातील कर्मचा-यांनी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे.

हवेली तालुक्याचे तहसिल कार्यालय खडकमाळआळी परीसरात असून, या कार्यालयामधील दोन्हीही वरीष्ठ अधिकाऱ्यांच्याबरोबर, कार्यालयामधील सहा कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. हवेली तहसिल कार्यालयात तालुक्याच्या सर्वच भागातून शेतकरी, नागरिक, विद्यार्थी व पालक विविध कामांसाठी ये जा करत असतात. या तहसील कार्यालयाच्या शेजारी पुणे शहर तहसील कार्यालय, नगर भूमापन अधिकारी कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालय असल्याने याठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. पुणे शहर व उपनगरांतील अनेक नागरिक याठिकाणी कामानिमित्ताने मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांच्यासह आठ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने, हवेली तहसिल कार्यालयासह आसपासच्या कार्यालयातही भितीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान वरील आठ जणांच्या बरोबरच हवेली तहसील कार्यालयातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा आणखी वाढण्याची भिती एका वरीष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. हवेली तहसिल कार्यालयामधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव प्रशासन व नागरिकांची चिंता वाढवणारा आहे. दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांसह कार्यालयातील सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कार्यालयातील इतर कर्मचा-यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन वरील वरीष्ठ अधिकाऱ्याने केले आहे. 

दरम्यान हवेली तहसील कार्यालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अभिलेख कक्ष (रेकॉर्ड रुम) बंद ठेवला असून येथे विनाकारण फिरणा-यांना अटकाव केला आहे. कोरोना संक्रमणाच्या भितीमुळे याठिकाणी कर्मचारीही येण्यास तयार नाहीत मात्र वरिष्ठांच्या कार्यालयीन आदेशामुळे येथील कार्यविवरण मात्र कमी कर्मचा-यांच्या उपस्थितीत धिम्या गतीने सुरू ठेवले आहे. याबाबत महसूल कर्मचारी संघटनेने कोविड संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी कर्मचा-यांना आठवड्यातील दिवस विभागून कामकाज देण्याविषयी वरिष्ठ कार्यालयास निवेदनाद्वारे कळवले आहे.

याबाबत बोलताना निवासी नायब तहसीलदार अजय गेंगाणे म्हणाले, दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांसह सहा कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत, ही बाब खरी आहे. त्यामुळे कार्यालय पुर्णपणे सॅनिटाईझ केले आहे. कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, तहसिल कार्यालयात नागरिकांनी गर्दी करु नये ही विनंती आहे. अगदी महत्वाच्या कामांसाठीच नागरिकांनी तहसील कार्यालयात यावे अशी विनंती आहे. कोविड संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com