
दौंड : तालुक्यात बाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्याने तीन महिलांसह एकूण पाच जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. तालुक्यात बाधित व्यक्तींच्या संपर्कात येणारे कुटुंबीय आणि नागरिक आरोग्य यंत्रणांच्या अलगीकरण संबंधी सूचनांकडे दुर्लक्ष करून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत.
दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील १५ वर्षांच्या दोन मुली, ५५ वर्षांच्या एक माहिला आणि चौफुला येथील ६५ वर्षीय एक पुरूष यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांनी दिली. दौंड शहरातील कुंभार गल्ली येथे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने एका ३० वर्षीय तरूणास कोरोनाची बाधा झाल्याची माहिती दौंड उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली.
दौंड शहर व तालुक्यात २९ एप्रिल ते १० जुलै या कालावधीत एकूण २२० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. बाधितांमध्ये दौंड शहरातील ८८, तालुक्यातील ६६, शहरातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातचे ४६, गट क्रमांक पाचचे ०५, पोलिस, इंडियन रिझर्व्ह बटालियन (आयआरबी) चे १५ पोलिस यांचा समावेश होता. त्यापैकी १२९ जण बरे झाले. बाधितांचा वयोमान ०२ ते ८२ या दरम्यान आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दौंड शहरातील तीन महिलांसह सात नागरिक आणि तालुक्यातील एक, असे एकूण आठ जणांचा एकूण पाच जणांचा २५ मे ते ७ जुलै या कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दौंड मधील दोन कोविड केअर सेंटर, यवत (ता. दौंड) येथील कोविड केअर सेंटर आणि पुणे व लोणी काळभोर येथील शासकीय व खासगी रूग्णालयांमध्ये बाधितांवर उपचार सुरू आहेत.
गोपाळवाडी (ता. दौंड) प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर-दौंड शहरालगतच्या गोपाळवाडी गावात दोन बाधित आढळल्यानंतर प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. सरपंच वैशाली शिंदे यांनी ही माहिती दिली. तहसीलदार संजय पाटील व गट विकास अधिकारी गणेश मोरे यांनी गोपाळवाडी येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत सूचना दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.