esakal | ...अन् 'त्या' कोरोना संसर्ग झालेल्या नर्सने टोचले १५ जणांना इंजेक्शन
sakal

बोलून बातमी शोधा

corona-v.jpg

लासुर्णे (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कोरोनाची लागण झालेल्या नर्सने (परिचारिकेने) १५ रुग्णांना इंजेक्शन टोचले असून सर्व रुग्ण लो-रिस्कमध्ये आहेत. या रुग्णांना होम क्वाॅरंटाईन करण्यात आले  आहे.

...अन् 'त्या' कोरोना संसर्ग झालेल्या नर्सने टोचले १५ जणांना इंजेक्शन

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर : लासुर्णे (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कोरोनाची लागण झालेल्या नर्सने (परिचारिकेने) १५ रुग्णांना इंजेक्शन टोचले असून सर्व रुग्ण लो-रिस्कमध्ये आहेत. या रुग्णांना होम क्वाॅरंटाईन करण्यात आले  आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

लासुर्णेमधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्सला गेल्या दोन दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. या नर्सकडे इंजेक्शन टोचण्याचे काम होते. तिने कामावरती असताना १५ रुग्णांना इंजेक्शन टाेचले असून त्यांचा आरोग्य विभागाने शोध घेतला आहे.हे रुग्ण इंदापूरच्या पश्‍चिम भागातील वेगवेगळ्या गावातील आहेत. त्यांना होम क्वॉरंटाईन केले असून त्यांच्या तब्येतीवरती लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

या नर्सच्या संपर्कात आलेल्या वैद्यकीय अधिकारी व चार कर्मचाऱ्यांचा स्वॅब (घशातील नमुने) घेतले असून पाच जणांचा रिपार्ट आज सायंकाळी येणार आहे.तसेच उर्वरित सुमारे १८ कर्मचाऱ्यांचे स्वॅब आज इंदापूरमध्ये देण्यात आले असून याचा अहवाल सोमवार (ता.१२) रोजी मिळणार आहे. 

काँग्रेसला बसणार मोठा धक्का? २२ आमदार दिल्लीत 

दुसऱ्या नर्सच्या पतीला...
लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुसऱ्या एका नर्सला पतीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून संबधित कुंटूब हे बारामतीमध्ये राहत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा