पुणे : नाकाबंदीवर कार्यरत असलेल्या ओतूरच्या पोलिस अधिकाऱ्याला कोरोना

पराग जगताप
रविवार, 28 जून 2020

- ओतूरच्या पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण.

ओतूर (ता.जुन्नर) : माळशेज घाटातील नाकाबंदीवर कार्यरत असलेल्या ओतूरच्या पोलिस अधिकाऱ्यास कोरोनाची बाधा झाल्याने ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली असून, त्याचबरोबर शिरोली व संतवाडी  (आळे) येथे प्रत्येकी एक रुग्ण मिळाला असून, जुन्नर तालुक्याची एकूण रुग्ण संख्या शनिवारी रात्री ५५ झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ओतूर ता.जुन्नर येथील पोलिस ठाण्यात अंतर्गत माळशेज घाटावर जिल्हा हद्दीच्या नाकाबंदीवर कर्तव्यावर असलेल्या तरूण पोलीस अधिकार्याला कोरोनाची लागण झाली यापूर्वी येथे कार्यरत असणारे ओतूर येथीलच एक शिक्षक व त्यांचा भाऊ यांनाही कोरोनाची लागण झाली होती ते नुकतेच बरे होऊन परत घरी आले आहे. मात्र, शिक्षक व आता पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने या नाकाबंदीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने या कोरोना योद्धांना कर्तव्यावर योग्य साधनसामूग्री उपब्ध करुन देणे गरजेचे आहे, जेणे करून त्यांना कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होणार नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ओतूरमधील कोरोना रुग्ण शिक्षक व त्याचा भाऊ दोघे ही कोरोनावर मात करुन उपचार घेवून नुकतेच घरी आले होते. परत ओतूर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने ओतूर शहरवासियांनी पुढील काळात काळजी घेणे गरजे आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असून दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. काल शनिवारी ओतूर पोलिस अधिकाऱ्यांबरोबरच शिरोली व संतवाडी (आळे) येथे एक असे तीन कोरोनाची लागण झालेले रुग्ण जुन्नर तालुक्यात आढळून आले आहे. या सर्व रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना लेण्याद्री येथील कोविड सेंटरमध्ये नेण्यात आले असून, त्याची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुन्नर तालुक्यातील एकूण कोरोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५५ झाली आहे. यापैकी ३२ जण बरे झाले आहेत तर २१ जण उपचार घेत आहेत.तर दोन मयत झाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुन्नर तालुक्यात गावनिहाय बरे व मृत्यू झालेले व एक्टिव्ह रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे:- डिंगोरे - १  (बरा), सावरगांव -  ५ (बरे), मांजरवाडी -  २ (बरे),पारुंडे - ३  (बरे), आंबेगव्हाण - २ (बरे),धोलवड - ३ (बरे ), धालेवाडी तर्फे मिन्हेर - १ (बरा), विठ्ठलवाडी -वडज - १ (बरा),शिरोली तर्फे आळे २ (बरे), खिलारवाडी - १(बरा) ,कुरण - १(बरा),
चिंचोली - ३(बरे),ओतुर - २ (बरा) जुन्नर- १(बरा), राजुरी- १(बरा), नवलेवाडी - १(बरा) ,धामणखेल -१(बरा),कुसुर- १. *मृत्यू:- औंरगपूर - १(मृत्यू),  मोकासबाग-१ (मृत्यू),  एक्टिव्ह :- ओतूर-१,संतवाडी (आळे)१,  बोरी- ३,  खामुंडी-७, खानापूर-३, शिरोली खुर्द-४,उंब्रज नंबर एक-१. धनगरवाडी - १.एकुण रुग्ण ५५, मृत्यू - २, बरे ३२, ऍक्टिव्ह - २१.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection to Otur police officer in Pune

टॅग्स
टॉपिकस