बारामती शहराची स्थिती गंभीर, कारण...

मिलिंद संगई
Sunday, 6 September 2020

शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागल्याने आता ग्रामीण भागातही चिंतेचे वातावरण आहे. 

बारामती : शहरातील कोरोनाचा उद्रेक आजही कायमच राहिला आहे. गेल्या चोवीस तासात बारामतीत 84 रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ता 1372 पर्यंत गेली आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागल्याने आता ग्रामीण भागातही चिंतेचे वातावरण आहे. 

आजच्या यादीत शहरातील 33 तर ग्रामीण भागातील 51 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान काल 258 आरटीपीसीआर तपासण्या झाल्या आहेत. त्या पैकी 105 रुग्ण जरी निगेटीव्ह आलेले असले तरी अजूनही 119 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्या मुळे आज बारामतीत कोरोना रुग्णांचा अधिकच उद्रेक होण्याची भीती आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काल बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली, रुई ग्रामीण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खाजगी प्रयोगशाळेत 402 रुग्णांच्या तपासण्या झाल्या. कोरोनाचे संकट सुरु झाल्यापासून बारामतीत 24 तासात चारशेहून अधिक तपासणी होण्याचा कालचा पहिलाच दिवस होता.

वैद्यकीय व्यावसायिकांच्या सल्ल्यांनुसार जितक्या जास्त तपासण्या होतील तितके चांगले, असा निष्कर्ष असल्याने बारामतीतही तपासण्यांचा वेग वाढविण्यात यश आलेले आहे. चार ठिकाणी तपासण्या होत असल्याने चारही ठिकाणचा ताण किंचीत कमी झाला आहे. एकीकडे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यांच्या संपर्कातील लोकही तपासणीसाठी गर्दी करत असल्याने तपासणीवरही मोठा ताण येऊ लागला आहे. 

दृष्टीक्षेपात बारामतीचा आढावा
•    आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या- 1372
•    उपचाराखाली असलेले रुग्ण- 690
•    आजपर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेले रुग्ण- 45
•    पॉझिटीव्ह असलेले मात्र लक्षणे नसलेले रुग्ण- 315
•    सौम्य लक्षणे असलेले रुग्ण- 266
•    मध्यम लक्षणे असलेले- 60
•    ऑक्सिजनवर असलेले रुग्ण- 40
•    व्हेंटीलेटरवर असलेले रुग्ण- 9

पत्रकारांच्या विमा संरक्षणाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; अधिवेशनात मांडणार मुद्दा

दाखल रुग्णांची दवाखानानिहाय स्थिती खालीलप्रमाणे
•    रुई ग्रामीण रुग्णालय- 32
•    सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय- 100
•    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 211
•    नटराज नाट्य मंडळ कोविड सेंटर- 23
•    बारामती हॉस्पिटल- 44
•    विविध खाजगी रुग्णालय- 48
•    घरी विलगीकरणातील रुग्ण संख्या- 226
•    पुणे येथे उपचार घेत असलेले रुग्ण- 6

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection is on the rise in Baramati