बापरे! पुणे जिल्ह्यात कोरोनाने आता...

co.jpg
co.jpg

पुणे : पुणे शहरात जसा कोरोना वाढत आहे. तसाच आता तो जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात पसरत आहे. मंचर, भोर, दाैंड, पुरंदर, जुन्नर या तालुक्यांमध्ये कोरोनाचा मोठा फैलाव होताना दिसत आहे. कोरोनाचा ग्रामीण भागातील प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

आंबेगावमधील १२ गावांच्या सीमा सील-आंबेगाव तालुक्यात १२ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून शनिवारी रुग्णांमध्ये दोनची भर पडली. एकूण रुग्ण संख्या २७ झाली. त्यामुळे या गावांच्या सीमा सील केल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्यामुळे सुरक्षा समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच पोलिस, कामगार तलाठी, ग्रामसेवक व आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांचा गावात व सीमेवर पहारा सुरू झाला आहे. 

अजून ३३ जणांचे नमुने घेतले असून त्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे प्रशासन आणि गावकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. गिरवली व गांजवेवस्तीमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. घोडेगाव, साकोरे, शिनोली, निरगुडसर, जवळे, गांजवेवस्ती (वळती), वडगाव काशिंबेग, पिंगळवाडी (लांडेवाडी), फदालेवाडी, गिरवली ही गावे लोकसंख्येने मोठी आहेत. पेठ, एकलहरे ही गावे पुणे- नाशिक महामार्गालगत आहेत. या गावांमध्ये १२८ कोरोना सर्वेक्षण पथके कार्यरत केली असून १७५ कर्मचारी सर्वेक्षण करत आहेत. या गावांमध्ये जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या जात आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तालुक्यातील संशयित रुग्णांचे नमुने मंचर उपजिल्हा रुग्णालयामार्फत भीमाशंकर हॉस्पिटलमध्ये घेतले जातात. पॉझिटिव्ह रुग्णांवर भीमाशंकर हॉस्पिटलमध्येच उपचार केले जातात. होम क्वारंटाइन नागरिकांवर व सीमेवर नजर ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. शुक्रवारी (ता. २९) रात्री ११ वाजता खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे व गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी पेठ व एकलहरे येथे अचानक भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली.

जुन्नरमधील 11 गावांत शिरकाव- जुन्नर, ता. 30 : जुन्नर तालुक्‍यातील अकरा गावांतून कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तालुक्‍यात आतापर्यंत कोरोनाचे 20 रुग्ण आढळले असून यात 9 पुरुष व 11 महिलांचा समावेश आहे. त्यातील एका पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला, तर एक महिला रुग्ण बरी झाली आहे. त्यामुळे सध्या तालुक्‍यात कोरोनाचे 8 पुरुष व 10 महिला असे 18 रुग्ण आहेत. 

डिंगोरे (ता. जुन्नर) येथे 2 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. उपचारानंतर हा रुग्ण बरा झाला त्यानंतर जवळपास गेले दोन महिने तालुका कोरोना मुक्त होता. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने जुन्नरहून मुंबईला गेलेल्या नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जुन्नरला आपापल्या गावी धाव घेतली त्यानंतर धोलवड येथे कोरोनाचा दुसरा रुग्ण 23 मे रोजी आढळून आला. त्यानंतर गेल्या सात दिवसांत कोरोनाची रुग्ण संख्या वीस वर जाऊन पोचली आहे. यातील औरंगपूर येथील रुग्णाचे उपचारा दरम्यान शनिवारी ता. 29 रोजी निधन झाले आहे. उर्वरित अठरा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
 

गावनिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे 
सावरगाव - 5 , धोलवड - 3, मांजरवाडी - 2, पारुंडे - 2 , आंबेगव्हाण - 2 खिलारवाडी - 1, धालेवाडी तर्फे मिन्हेर - 1, विठ्ठलवाडी - 1, शिरोली तर्फे आळे - 1. यातील बहुतेक रुग्ण मुंबई येथून आलेले आहेत. 

दौंडच्या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू- दौंडमधील कोरोनाबाधित ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला, तर कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसीमधील ३० वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९ झाली आहे. 
शहरातील नव्वद वर्षीय महिलेला २६ मे रोजी कोरोनाची बाधा झाली होती. तिच्या संपर्कातील १७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. शुक्रवारी रात्री महिलेचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी सांगितले. 

भोरमध्ये येणाऱ्यांचा ओघ अद्याप सुरूच 
भोर : मुंबईहून भोरला येणाऱ्यांचा ओघ सुरूच असून मागील तीन दिवसांत तब्बल 109 जण तालुक्‍यात आले आहेत. त्यांना संस्था क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com