आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा धोका वाढतोय; आजचे अपडेट पाहा...

डी. के वळसे-पाटील
रविवार, 2 ऑगस्ट 2020

आंबेगाव तालुक्यात रविवारी (ता. २) तीन पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे.

मंचर : “आंबेगाव तालुक्यात रविवारी (ता. २) तीन पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९१ झाली आहे.

तसेच अजून १०४ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.” अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.

आतापर्यंत २०१  रुग्णांना बरे होऊन घरी पाठवले आहे. पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८१ जणांवर उपचार सुरू आहेत. मंचर व घोडेगाव येथे पॉझिटिव रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरपंच अनुक्रमे दत्ता गांजाळे व क्रांती गाढवे यांनी या दोन्ही शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू केली आहे.

तसेच मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाते.  ग्रामपंचायतीची भरारी पथके कार्यान्वित केली आहेत. आशा वर्कर व आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधून सर्वेक्षण सुरू केले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर शक्यतो पडू नये. असे आवाहन करण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection in three more people in Ambegaon taluka