esakal | आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात १९५ पाॅझिटिव्ह रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona infection

आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात १९५ पाॅझिटिव्ह रुग्ण

sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : “आंबेगाव तालुक्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज कोरोना बाधित रुग्णांची वाढत जाणारी संख्या प्रशासनाची चिंता वाढविणारी आहे. लवकरच अजून काही खासगी हॉस्पिटल चालक कोव्हीड उपचार केंद्र सुरु करणार आहेत. त्यामुळे ऑक्सिजन बेड वेटिंगचा प्रश्न संपुष्टात येण्यास मदत होईल.” अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती संजय गवारी यांनी दिली. आंबेगाव तालुक्यात गुरुवारी (ता. १५) १९५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये सर्वाधिक मंचर येथे तीस व अवसरी खुर्द येथे २८ कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. ऑक्सिजन बेडसाठी शुक्रवारी (ता. १६) अनेक रुग्ण वेटिंगवर होते. त्यांना बेड मिळण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांची धावपळ सुरु होती.

हेही वाचा: पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांची भीती दाखवून वृद्ध व्यापाऱ्याकडून मागितली 3 कोटींची खंडणी

“राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुक्यात प्रशासनाने कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासठी प्रयत्नाची पराकाष्टा करून मंचर, अवसरी खुर्द येथे सरकारी व खासगी हॉस्पिटल मध्ये १०० हून अधिक ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले आहेत. या व्यतिरिक्त जवळपास एक हजार रुग्णाची व्यवस्था अवसरी खुर्द कोविड उपचार केंद्रात केली आहे. पण गतिमान पद्धतीने संसर्ग झालेली रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. एकाच कुटुंबातील तीन ते चार व्यक्ती कोरोना बाधित आढळून येत आहेत. रुग्णाच्या सुविधेसाठी अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये कोव्हीड उपचार केंद्र सुरु व्हावीत म्हणून प्रांत अधिकारी सारंग कोडीलकर, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने यांनी शुक्रवारी (ता. १६) अनेक हॉस्पिटल चालकांच्या भेटी घेतल्या. त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन शहा यांनी दिले आहे.”असे गवारी यांनी सांगितले दिली.

रुग्णसंख्या-

एकुण कोरोनाबाधित रुग्णसंख्या : आठ हजार ४६,

बरे झालेले रुग्ण : सहा हजार ७७८,

मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्या : १२८,

उपचार सुरु असलेले रुग्ण : एक हजार १४१.

हेही वाचा: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पात राज्य सरकार उचलणार वाटा; शासन निर्णय जाहीर