कोरोनामुळे आइस्क्रीम व्यवसाय झाला थंड

शिमगा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आइस्क्रीम व्यवसाय तेजीत येतो. मात्र, यंदाही कोरोनामुळे धंदा थंडच आहे. जेथे दिवसाला २५ ते ३० हजार रुपयांचा व्यवहार होत होता, तिथे आता हजार रुपयेदेखील मिळत नाहीत.
Ice Cream
Ice CreamSakal

पुणे - शिमगा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आइस्क्रीम व्यवसाय तेजीत येतो. मात्र, यंदाही कोरोनामुळे धंदा थंडच आहे. जेथे दिवसाला २५ ते ३० हजार रुपयांचा व्यवहार होत होता, तिथे आता हजार रुपयेदेखील मिळत नाहीत. पार्सललादेखील खूपच कमी प्रतिसाद आहे, अशी माहिती आइस्क्रीम व्यावसायिक दत्तात्रेय कावरे यांनी दिली.

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधात शीतपेयांचा व्यवसाय सुरू आहे. मात्र त्याला मिळणारा प्रतिसाद अत्यंत कमी आहे. त्याचा फटका तुळशीबागेत आइसक्रीमचा व्यवसाय करीत असलेल्या कावरे यांना बसत आहे. अशीच स्थिती आइस्क्रीम क्षेत्रात कार्यरत असलेल्या इतर व्यवसायिकांची आहे.

Ice Cream
पुणेकरांनो, शनिवार रविवार विकेंड लॉकडाऊन; काय सुरू काय बंद?

दुकाने बंद असल्याने बाजारपेठांमध्ये कमी झालेली गर्दी, बाहेर फिरण्यावर असणारे निर्बंध, घरून काम सुरू असल्याने कार्यालयांत येणाऱ्यांची कमी झालेली संख्या, मर्यादित माणसांच्या उपस्थित होणारे कार्यक्रम, घरगुती स्वरूपात होणारे सण-उत्सव यामुळे आइस्क्रीमचा खप अगदी ५ ते १० टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे या धंद्यातील उलाढालदेखील कमी झाली आहे. त्यामुळे कामगारांचे पगार, दुकानाचे भाडे यासह दैनंदिन खर्च कसा भागवायचा व कर्जाचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्‍न व्यावसायिकांना पडला आहे.

...तर पोलिसांचा त्रास

केवळ पार्सलपुरती परवानगी आइस्क्रीम व्यवसायाला देण्यात आली आहे. त्यामुळे आवडत्या पदार्थांचे पार्सल घ्या व आपल्या घरी जाऊन खा, असा सल्ला व्यावसायिकांकडून दिला जातो. मात्र, काही ग्राहक पार्सल घेऊन आइस्क्रीम पार्लरच्या जवळपास थांबल्यानंतर त्यांना व व्यावसायिकांना पोलिसांकडून हटविण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com