esakal | खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण, कोरोना चाचणी बंधनकारक

बोलून बातमी शोधा

vaccination

येत्या १० एप्रिलपासून अंमलबजावणी; चाचणी न केल्यास प्रत्येकी हजार रुपयांचा दंड

खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण, कोरोना चाचणी बंधनकारक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व संस्था, कार्यालये, हॉटेल, दुकानांसह खासगी आस्थापना, इ-कॉमर्स, खासगी वाहनचालक व वाहतुकीची संबंधित अन्य कर्मचारी, दहावी, बारावीच्या परीक्षेशी संबंधित शिक्षक, कर्मचारी, बांधकाम कामगार, वृत्तपत्र वितरण करणारे कर्मचारी, मंगल कार्यालयातील कर्मचारी, उत्पादन क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांचे त्वरित कोरोना लसीकरण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. लसीकरण न झालेले कर्मचारी आणि कामगारांना १५ दिवसांची वैधता असलेले आरटीपीसीआर या कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे अनिवार्य आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार तर, संबंधित आस्थापनांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. या निर्णयाची येत्या १०
एप्रिलपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.

हेही वाचा - Pune Corona : पुण्यात नियमांचे पालन करत करावी लागणार खासगी वाहतुक

अत्यावश्‍यक सेवांचे कर्मचारी, दहावी, बारावीच्या परीक्षेशी संबंधित शिक्षक, व कर्मचारी, बांधकाम कामगार आणि कोरोनापासून सुरक्षेची उपाययोजना म्हणून पारदर्शक काच, अन्य साहित्याचे सुरक्षा कवच लावणाऱ्या आस्थापना, स्वतःभोवती प्लॅस्टिक शीट लावणाऱ्या वाहनचालकांना दंडात्मक कारवाईतून वगळण्यात आले आहे. मात्र या सर्वांनी लवकरात लवकर कोरोना लसीकरण करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय सरकारी कार्यालयात कामांसाठी येणाऱ्या सर्व अभ्यागतांना (व्यक्तींना) ४८ तासांची वैधता असलेले कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बाळगावे लागणार आहे. कोरोनाबाबतच्या नियमांचा पुन्हा पुन्हा भंग करणाऱ्या हॉटेल, दुकाने आणि खासगी आस्थापनांचा परवाना रद्द करणे किंवा कोरोना आपत्ती संपल्याची घोषणा होईपर्यंत संबंधित आस्थापना बंद ठेवण्याची कारवाई केली जाणार आहे.


खासगी आस्थापनांसाठी अटी व शर्ती

  • - सर्व कर्मचाऱ्यांची थर्मामिटर, प्लस आॅक्सिमिटरद्वारे नियमित तपासणी.
  • - एखादा कर्मचारी बाधित आल्यास, त्याच्या संपर्कातील अन्य कर्मचाऱ्यांचे
  • स्वखर्चाने विलगीकरण.
  • - ५०० पेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांनी स्वतंत्र क्वरांटाइन
  • सेंटर सुरु करणे अनिवार्य.
  • - बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची निवासी सोय असलेलीच बांधकामे सुरु राहणार.
  • - बांधकाम कामगारांना बांधकामाशी
  • संबंधित साहित्याची ने-आण करता येईल.