इंदापूरकरांनो सावधान, तालुक्‍यात कोरोनाचे आगमन 

corona
corona

भिगवण (पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भिगवण स्टेशन येथे आढळून आला आहे. भिगवण स्टेशन येथील महिलेचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. भिगवणमध्ये रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच भिगवण व परिसरात एकच खळबळ उडाली. 

इंदापूर तालुक्‍यामध्ये कोरोनाला टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यास मोठे यशही आले होते. परंतु, मंगळवारी (ता. 28) भिगवण स्टेशन येथील महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून जाऊ नये व योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

भिगवण स्टेशन येथील संबंधित महिला आजारी होती. तिच्यावर प्रथम येथील एका खासगी रुग्णालयात व नंतर आय.सी.यु. रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. उपचारानंतरही आजार बरा न झाल्यामुळे तिला प्रथम बारामती व तेथून पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. पुणे येथे तिची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत माहिती मिळताच प्रशासनाकडून महिलेच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. 

भिगवण व परिसरातील लोकांना घाबरू जाऊ नये. घरामध्ये राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com