खेड शिवापूरमधील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील अकरा जणांचे अहवाल...

महेंद्र शिंदे
मंगळवार, 30 जून 2020

खेड शिवापूर येथील एक जणाने खासगी दवाखान्यात कोरोना चाचणी केली. त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे सोमवारी आढळून आले. त्यानुसार या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांचे नमुने

खेड शिवापूर (पुणे) : हवेली तालुक्यातील खेड शिवापूर येथे एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती खेड शिवापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एम. राजगे यांनी दिली.

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

खेड शिवापूर येथील एक जणाने खासगी दवाखान्यात कोरोना चाचणी केली. त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे सोमवारी आढळून आले. त्यानुसार या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

खेड शिवापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एम. राजगे यांनी सांगितले की, खेड शिवापूर येथील एक जणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील आठ आणि इतर तीन जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient in Khed Shivapur in contact with eleven people