कोरोनाबाधित म्हणताहेत, जेजुरी कोविड सेंटर, नको रे बाबा... !

covid center.jpg
covid center.jpg

खळद (पुणे) : पुरंदर तालुक्‍यातील जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत असणारे तक्रारवाडी येथील कोविड केअर सेंटर येथे रुग्णांची मोठ्या प्रमाणावरती हेळसांड होत असल्याने येथे दाखल होण्यास "नको रे बाबा...' अशी म्हणण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. 

सध्या पुरंदर तालुक्‍यामध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, अशावेळी रुग्णांना सासवड, जेजुरी व दिवे येथे शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जाते तर परिस्थितीनुसार काही रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेतात. जेजुरी येथील सेंटरमध्ये दाखल झालेला रुग्ण हा दुसऱ्या दिवशी या सेंटरमधून "मला घरी न्या' अशी कैफियत आपल्या नातेवाइकांकडे करत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. 

यासंदर्भात येथील काही रुग्णांनी आपली कैफियत मांडली. रुग्ण दाखल झाल्यावर एकदाच त्याला काही ठराविक दिवसांच्या गोळ्या-औषधे दिली जातात. यावेळी गोळ्या घेण्याचे प्रमाण सांगतानाही तिरस्काराच्या भावनेतून सांगितले जाते. यातून सर्वसामान्य रुग्णांना या गोळ्यांचे प्रमाणही समजावले जात नाही व त्यानंतर त्याची कोणतीही विचारपूस केली जात नाही. येथे आहारापासून ते स्वच्छतेपर्यंत सर्वच बाबींच्याकडे दुर्लक्ष होत आहे. रुग्णांना आपल्याला झालेल्या कोरोना पेक्षाही येथे मिळणाऱ्या सुविधांमुळे आपण लवकर बरे होणार नाही अशी मानसिकता तयार होत असल्याने ते आपल्या नातेवाइकांना फोन करून आम्हाला येथून घेऊन जा, असे सांगत आहेत. येथील आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. 
 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या कोविड केअर सेंटरची संपूर्ण जबाबदारी जेजुरी ग्रामीण रुग्णालयावर सोपविली आहे. आपण सासवड व दिवे हे दोन सेंटर सांभाळत आहे. 
- रूपाली सरनोबत, तहसीलदार, पुरंदर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com