पुण्यातील या गावात अखेर कोरोना दाखल...कारण तर जाणून घ्या  

corona1
corona1

वाल्हे (पुणे) : कोरोनापासुन मुक्त राहिलेल्या पुरंदर तालुक्यातील मांडकी गावाचा कोरोनाच्या यादीत अखेर समावेश झाला आहे. येथील एक महिला आपल्या माहेरी सातारा जिल्ह्यात काही कार्यक्रमानिमित्त गेली असता त्या ठिकाणी त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांना उपचारार्थ सातारा येथे दाखल करण्यात आले आहे.  

मांडकीकरांनी गावामध्ये कोरोनाचा प्रवेश होऊ नये म्हणून गेल्या चार महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात काळजी घेतील होती. मात्र, शासनाने लॉकडाउन उठविल्यानंतर त्याचा फायदा घेत अनेक जण प्रवास करू लागले आहेत. त्यांची हिच चूक गावामध्ये कोरोनाचा प्रवेश करण्याला कारणीभूत ठरत आहे. मांडकी येथील एक महिला सातारा जिल्ह्यातील आपल्या माहेरी एका कार्यक्रमानिमित्त आपल्या पतीसोबत गेली होती. मात्र, त्याठिकाणी गेल्यानंतर त्यांना काही त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना सातारा येथेच रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. 

याबाबत पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले की, सदर महिला सातारा येथे माहेरी गेल्यानंतर कोरोनाबाधित झाली असल्याचे सांगितले असून, त्यांच्यावर सातारा येथेच उपचार सुरू आहे. मात्र, त्या पुरंदर तालुक्यातील रहिवाशी असल्याने शासनाच्या नियमानुसार कोरोनाबाधित म्हणून त्यांची नोंद पुरंदर तालुक्यात धरली आहे. मांडकी गावातील पहिला रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने गावामध्ये निर्जुतुकीकरण करण्याबरोबरच स्वच्छतेच्या आणि गावातील रूग्ण सर्वेक्षणाच्या सुचना आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीला दिल्या आहेत.

दरम्यान, गावातील महिला कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळाल्याबरोबर निर्जंतुकीरणाबरोबरच आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक यांच्या मदतीने गावात सर्वेक्षण सुरू केल्याची माहिती सरपंच सतिश जगताप यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com