प्रबळ इच्छाशक्तीच! पुण्यात शंभर वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवले

सुषमा पाटील
Wednesday, 29 July 2020

दोन दिवस पोटात अन्न पाणी न घेतलेल्या आजींना प्रथम गोळ्यांची पावडर करून पाण्यातून देण्यात आली. हळहळू त्यांच्या शरीराकडून उपचारा करताना प्रतिसाद लाभत गेला त्यामुळे आजीची प्रकृती ठणठणीत झाली. असे आजींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

रामवाडी(पुणे): प्रबळ इच्छाशक्ती जोडीला सकारत्मक विचार आणि चांगली प्रतिकार शक्ती असेल तर कोणत्याही वयात रोगाविरुद्ध लढता येते हे 100  वर्षांच्या आजींनी सिध्द करुन दाखवून दिले आहे. कोरोनामुक्त झालेल्या आजींना प्रशासकीय अधिकारी कर्मचारी तसेच रुग्णालयातील स्टाफकडून फुलांचा वा टाळ्यांच्या गजरात स्वागत करत निरोप देण्यात आला.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चंदननगरमध्ये बोराटे वस्तीमध्ये राहणाऱ्या बाई हरिश्चंद्र दराडे (वय 100) आजींना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील नातेवाईकांची स्वॅब टेस्टींग केली असता , तीन जण पॉझिटिव्ह आले तर, दोन जण निगेटिव्ह आले. 
ज्या वेळी त्यांचे नातेवाईक आजींना खराडीतील कोविड सेंटर घेऊन आले त्यावेळी, आजीची रक्तदाबाची पातळी ही 88 ते 48 पर्यत आली होती, त्याच बरोबर ऑक्सिजन पातळीही 60 पर्यत आल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. दोन दिवस आजीने अन्न पाणी घेतले नाही. त्यांची ही प्रकृती खालावत असल्याने त्यांना नायडू तसेच ससून रुग्णालयात शिफ्ट करण्यासाठी खराडी सेंटरमधील डॉक्टरांनी चौकशी केली असता त्या ठिकाणी बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. घरची  बिकट परिस्थिती असल्याने घरातील नातेवाईक हे खासगी रुग्णालयात घेऊ जाऊ शकत नव्हते. अशा वेळी  मनाने खचलेल्या घाबरलेल्या कोरोना बाधित आजींना खराडी रुग्णालयातील कॉन्सिलिंग विभागाकडून धीर मिळाला मनोबल वाढवले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु केले. 

राज्यात दहावीचा निकाल लागला ९५ टक्के : यंदाही मुलींनीच मारली बाजी

दोन दिवस पोटात अन्न पाणी न घेतलेल्या आजींना प्रथम गोळ्यांची पावडर करून पाण्यातून देण्यात आली. हळहळू त्यांच्या शरीराकडून उपचारा करताना प्रतिसाद लाभत गेला त्यामुळे आजीची प्रकृती ठणठणीत झाली. असे आजींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले. आज शंभरी पुर्ण केलेल्या आजीं ह्या कोरोनातून मुक्त होऊन ज्या वेळी  बाहेर पडत होत्या त्यावेळी रुग्णालयाच्या स्टाफने टाळ्यांच्या गजरातूनआजींना निरोप दिला  
 

धक्कादायक! पुण्यात आजारपणाला कंटाळून पत्नीची हत्या; पतीने घेतला गळफास


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune a hundred year old grandmother win fight with Corona