Corona Update : पुणे शहरात दिवसेंदिवस होतेय कोरोना रुग्णांची वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients
Corona Update : पुणे शहरात दिवसेंदिवस होतेय कोरोना रुग्णांची वाढ

Corona Update : पुणे शहरात दिवसेंदिवस होतेय कोरोना रुग्णांची वाढ

पुणे - पुणे शहरातील कोरोनाचा संसर्ग जून महिन्यापासून सातत्याने कमी होत असला तरी, मागील तेरा दिवसांपासून पुन्हा एकदा शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढू लागला आहे. यामुळे पुणेकरांच्या कोरोनाबाबतची काळजी वाढली आहे. शहरात गेल्या तेरा दिवसात २०२ सक्रिय कोरोना रुग्ण वाढले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असली तरी पुण्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. मात्र पुणेकरांनी खबरदारी घेणे आवश्‍यक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पुण्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या अकरा दिवसांपूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी ६४७ इतकी कमी झाली होती. तीच संख्या शनिवारी (ता.२०) पुन्हा एकदा ८४९ झाली आहे. या आकडेवारीवरून गेल्या तेरा दिवसात शहरात २०२ सक्रिय कोरोना रुग्ण वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रोज रात्री शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्ण स्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालातून शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: इंदापूर शहराला सलग चौथ्यांदा देश पातळीवर कचरामुक्त शहर म्हणून पुरस्कार

शनिवारी (ता. २०) दिवसभरात पुणे जिल्ह्यात २३९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारच्या (ता.१९) नवीन रुग्ण संख्येच्या तुलनेत शनिवारी (ता.२०) जिल्ह्यात ३९ नवीन रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील दिवसांतील एकूण नवीन कोरोना रुग्णांत पुणे शहरातील ८६ रुग्ण आहेत. शहरातील नवीन रुग्णांतही शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ११ नवे रुग्ण वाढले आहेत. शनिवारी दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये ५३ , जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ७९, नगरपालिका १५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात सहा नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील दोन आणि पिंपरी चिंचवड व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एका मृत्यूचा समावेश आहे.

दरम्यान, दिवसभरात २४८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील ८१ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ६५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ९०, नगरपालिका हद्दीतील नऊ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील तीन जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरातील तेरा दिवसातील तारीखनिहाय रुग्ण संख्या

- ८ नोव्हेंबर --- ६४७

- ९ नोव्हेंबर --- ७०१

- १० नोव्हेंबर --- ७११

- ११ नोव्हेंबर --- ७४२

- १२ नोव्हेंबर --- ७६०

- १३ नोव्हेंबर --- ७५४

- १४ नोव्हेंबर --- ७६६

- १५ नोव्हेंबर --- ७५९

- १६ नोव्हेंबर --- ८०८

- १७ नोव्हेंबर --- ८४३

- १८ नोव्हेंबर --- ८८६

- १९ नोव्हेंबर --- ८४६

- २० नोव्हेंबर --- ८४९

- तेरा दिवसातील एकूण वाढ --- २०२

loading image
go to top