इंदापूर शहराला सलग चौथ्यांदा देश पातळीवर कचरामुक्त शहर म्हणून पुरस्कार | Award | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramnath Kovind
इंदापूर शहराला सलग चौथ्यांदा देश पातळीवर कचरामुक्त शहर म्हणून पुरस्कार

इंदापूर शहराला सलग चौथ्यांदा देश पातळीवर कचरामुक्त शहर म्हणून पुरस्कार

इंदापूर - इंदापूर नगरपरिषदेस सलग चौथ्यांदा स्वच्छ सर्वेक्षण अभियान-२०२१ चा कचरामुक्त शहर हा केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला. असून देशपातळीवर कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. पाच राज्यातील ३०४ नगरपरिषदेतून इंदापूर नगरपरिषदेचा चौदावा क्रमांक आला असून ओडीएफ डबल प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे शनिवार दि. २० नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नगरसेवक भरत शहा, जावेद शेख व मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून नगरपरिषदेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, स्वच्छता अभियान सचिव दुर्गाशंकर मिश्रा उपस्थित होते. अशी माहिती नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी दिली.

स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत इंदापूर नगरपरिषदेने नागरिकांमध्ये कचऱ्याबाबत जन जागृती करून स्वच्छतेतून समृद्धीची भावना शहरात रुजवत शहरातील कचरा संकलन केंद्राचे बगिच्यात रूपांतर केले. घरगुती कचरा हा ओला, सुका, प्लॅस्टीक, सॅनिटरी असे विलगीकरण शंभर टक्के करून त्याचे कंपोस्ट खतात रूपांतर केले. नगरपरिषदेस महाराष्ट्र शासनाचा हरित ब्रँड प्रमाणपत्र प्राप्त आहे. हागणदारी मुक्त योजनेअंतर्गत शेकडो लाभार्थींना वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात आली आहेत.

हेही वाचा: सांडपाण्याच्या चेंबर मध्ये पडला, परंतु स्थानिकांमुळे वाचला

वसुंधरा अभियानात शहरात हजारो वृक्षांची लागवड, संवर्धन करून बायो डायव्हर्सिटी पार्क तयार करण्यात आले असून त्यात नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून मोठे योगदान दिले आहे. सुका, जैव वैद्यकीय व ई कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. पथनाट्य, चित्रकला, चारोळी, लघुचित्रपट, चित्रांचे प्रदर्शन यातून स्वच्छ सर्वेक्षण प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. शहरामध्ये भिंती रंगवून बोलक्या भिंती तयार करून त्यातून स्वच्छतेचा संदेश देवून ते सेल्फी पॉईंट झाले आहेत.

loading image
go to top