esakal | हवेली, मुळशी, वेल्हे तालुक्यात वाढलेत कोरोनाचे एवढे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona1

पुणे जिल्ह्यातील हवेली, मुळशी, वेल्हे तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. आजही तीनही तालुक्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

हवेली, मुळशी, वेल्हे तालुक्यात वाढलेत कोरोनाचे एवढे रुग्ण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली, मुळशी, वेल्हे तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. आजही तीनही तालुक्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

लोणी काळभोर : हवेली तालुक्यात मागिल चोविस तासात तब्बल १३७ नवीन रुग्ण आढळून आले असून, तालुक्यातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या तब्बल सातशेवर पोचली असून, मागिल तीन महिण्याच्या कालावधीत आढळून आलेल्या रुग्णांची संख्या बाराशेवर पोचली आहे. गुरुवारी दिवसभरात ६६ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले.

आईने सांगितला तसा अभ्यास केला आणि बोर्डाच्या परीक्षेत पहिला आला

हवेली तालुक्यात मागिल चोविस तासात आढळलेले गावनिहाय रुग्ण - देहू (७), होळकरवाडी (१), नांदेड (६), गोऱ्हे बुद्रुक (१), खडकवासला (६), नऱ्हे (१६), किरकिटवाडी (६), मालखेड (३), डोणजे (१), गोऱ्हे खुर्द (१), खानापूर (१), मांगडेवाडी (११), गुजर- निंबाळकरवाडी (१), भिलारेवाडी (२), कुंजीरवाडी (२), आळंदी म्हातोबाची (१), उरुळी कांचन (१२), पिंपरी- सांडस (५), बुर्केगाव (१०), पेरणे (५), वढू खुर्द (२), लोणीकंद (३), कदमवाकवस्ती कोविड सेंटर (१०), मांजरी बुद्रुक (१५), लोणी काळभोर (३) व कोंढवे धावडे (४).   

दरम्यान, पूर्व हवेलीमधील कोरोनाबाधित रुग्ण व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क नातेवाईकांना मागिल आठ दिवसापांसून रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने वणवण फिरावे लागत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांनी पाठपुरावा चालू ठेवल्याने आरोग्य विभागाने आज दिवसभरात वाघोली व कदमवाकवस्ती येथे चारशेहून अधिक बेड ताब्यात घेतले आहेत. 

येरवडा कारागृहातून पाच कैदी पळाले
 
पिरंगुट : मुळशी तालुक्यातील कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालल्याने मुळशीकरांची चिंताही वाढत आहे. आज तालुक्यात कोरोनाचे १४ रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता २७७ झाली आहे.

आज सूस, हिंजवडी, माण, भूगाव आणि कासार आंबोली येथे प्रत्येकी दोन, तर मारुंजी, जांबे, घोटावडे व अंबडवेट येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडले आहेत.  आज कोरोना आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये २३ जणांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या १०५ झाली आहे. आज पिरंगुट येथील एका खासगी रुग्णालयात पौड येथील एका पासष्ट वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सात झाली आहे. सध्या तिघेजण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.  

वेल्हे : वेल्हे तालुक्यातील वांजळे गावातील सख्ख्या बहिण भावासह निगडे मोसे गावातील दोन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे. काल 32 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी २९ जणांचे रिपोर्ट आले असून, यामधील चार जण पॉझिटीव्ह आले आहेत. पंचवीस जणांच्या टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत, तर उर्वरीत तीन जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

वांजळे गावातील  ४४ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीच्या दोन्ही मुलांना कोरोनाची बाधा झाली असून, आई व पत्नीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे, तर निगडे मोसे गावातील बाधित व्यक्तीच्या संपर्कातील एक महिला व एका पुरुषास कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट आले आहे. वेल्हे तालुक्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या ४९ वर पोहचली असून, ३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला असून, इतर बारा रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.  

Edited By : Nilesh J shende
 

loading image