खेडमधील या तीन गावांत आढळले कोरोनाचे रुग्ण

corona
corona


राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यात मुंबई कनेक्शनमधून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये होत असलेली वाढ सुरूच असून, काल (ता. २९) मुंबईहून वेताळे, वाशेरे आणि वाजवणे या गावांमध्ये आलेले प्रत्येकी एकजण पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाल्याची माहिती खेडचे सभापती अंकुश राक्षे आणि तालुका आरोग्य अधिकारी बी. बी. गाढवे यांनी दिली. त्यामुळे खेड तालुक्यात आता २३ कोरोनाबाधित झाले आहेत. 

खेड तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील तब्ब्ल ४१ जणांच्या घशातील द्राव काल आणि आज तपासणीसाठी घेण्यात आले आहेत,  तालुक्यातील येलवाडी येथे 3 जण पॉझिटिव्ह मिळाले आहेत, पण तांत्रिकदृष्ट्या त्यांची नोंद पिंपरी चिंचवड येथे करण्यात आली आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

चाकण येथील एका खासगी रुग्णालयात पडवळवस्ती (वासुली) येथील एक कामगार अर्धांगवायूचा झटका आल्याने १७ ते २४ मे दरम्यान दाखल होता. तो डिस्चार्ज घेऊन सोलापूर जिल्ह्यात त्याच्या गावी गेला. मात्र, २४ मे रोजी त्याच्या घशातील द्राव तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चाकणकरांची चिंता वाढली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com