कोरोनाच्या काळात ‘स्टार्टअप’ ठरला ‘विघ्नहर्ता’

सनील गाडेकर
Wednesday, 26 August 2020

हा स्टार्टअप नेमकं करतो काय ? 
व्हर्च्युअल व ऑगमेंटेड रिॲलिटी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे प्रमाण मानून ‘कॉग्निलेमेंट्‌स’ने शिक्षण, ऑटोमोबाईल, पर्यटन आणि मनोरंजन क्षेत्रासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल प्रेझेन्स सोल्यूशन बनवले आहे. व्हीआर आणि इतर तांत्रिक माध्यमातून उत्पादनांचा अनुभव घ्यायचा, एखादी वस्तू विकत घेण्यासाठी आलेल्या एकूण ग्राहकांपैकी किती लोकं ती वस्तू खरेदी करू शकतात?, याचा डेटा जमा करून हे स्टार्टअप त्यांना देते. त्यामुळे वस्तूची विक्री करणाऱ्यांना नेमक्‍या ग्राहकांवर लक्ष ठेवून आपली वस्तू विकता येते.

पुणे - स्टार्टअपमध्ये नोकरी करावी की नाही?, अशी शंका मनात होती. मात्र चांगली संधी मिळणार असल्याने मी ‘कॉग्निलेमेंट्‌स’मध्ये जॉईन झालो. त्यामुळे नोकरीची शोधाशोध थांबली. माझ्यासह २१ जण कोरोनाच्या काळात या कंपनीत रुजू झाले. त्यामुळे आम्हा सर्वांसाठी हा स्टार्टअप नोकरीच्या दृष्टीने खऱ्याअर्थाने विघ्नहर्ता ठरला, अशी भावना अंगद बिंद्रा यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंगद यांनी एनआयटी सुरतमधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर ते नोकरीच्या शोधात होते. लॉकडाउनमध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी कामगारांना घरचा रस्ता दाखविला तर अनेकांची पगार कपात केली. मात्र, ‘कॉग्निलेमेंट्‌स’ याला अपवाद ठरले. नऊ जणांपासून सुरुवात झालेल्या या स्टार्टअपमध्ये ३० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

तंत्रज्ञानाच्या युगात यशस्वी व्हायचे असल्यास स्वतःला सिद्ध करा - अच्युत गोडबोले 

अंगद म्हणाले की, दुसऱ्या ठिकाणी माझी नोकरी निश्‍चित झाल्यानंतरही ‘रिस्क’ घेऊन मी येथे जॉईन झालो. मी अगदी योग्य निर्णय घेतल्याचे समाधान आहे. 

हा स्टार्टअप नेमकं करतो काय ? 
व्हर्च्युअल व ऑगमेंटेड रिॲलिटी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे प्रमाण मानून ‘कॉग्निलेमेंट्‌स’ने शिक्षण, ऑटोमोबाईल, पर्यटन आणि मनोरंजन क्षेत्रासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल प्रेझेन्स सोल्यूशन बनवले आहे. व्हीआर आणि इतर तांत्रिक माध्यमातून उत्पादनांचा अनुभव घ्यायचा, एखादी वस्तू विकत घेण्यासाठी आलेल्या एकूण ग्राहकांपैकी किती लोकं ती वस्तू खरेदी करू शकतात?, याचा डेटा जमा करून हे स्टार्टअप त्यांना देते. त्यामुळे वस्तूची विक्री करणाऱ्यांना नेमक्‍या ग्राहकांवर लक्ष ठेवून आपली वस्तू विकता येते.

‘ॲग्रोवन -सेव्हन मंत्रा’तर्फे प्रतिकारशक्ती वाढविणारी ‘मसाला बास्केट’

मार्चपासून आतापर्यंत ‘कॉग्निलेमेंट्‌स’चे कुटुंब नऊवरून ३० कर्मचाऱ्यांपर्यत वाढले आहे. इतरांच्या नोकऱ्या जात असताना आम्ही २१ जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली, ते ही कोणाचा पगार कपात न करता. 
- समुद्रगुप्ता तालुकदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, कॉग्निलेमेंट्‌स

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Period Startup Job cognilements