esakal | पुणे मार्केटयार्डात लसीकरण केंद्र; अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे मार्केटयार्डात लसीकरण केंद्र सुरु

पुणे मार्केटयार्डात लसीकरण केंद्र सुरु

sakal_logo
By
प्रविण डोके

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्ड हमाल भवन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि दि पूना मर्चंट चेंबरच्या सहकार्याने महापालिकेच्या वतीने सोमवारपासून (ता.१०) कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. कामाच्या ठिकाणी लसीकरण या पार्श्वभूमीवर हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आला आहे. या लसीकरण केंद्रात साधारणः दररोज २०० ते ३०० इतक्या लस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे बाजार घटकांना आता लस मिळणार आहे. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते या लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, उपसचिव सतीश कोंडे, दि पुना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष अशोक लोढा, सहसचिव विजय मुथा, नगरसेवक प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठीया, अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष अमोल घुले, फळ विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे, तरकारी विभाग प्रमुख दत्तात्रय कळमकर, आप्पा गायकवाड, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, अध्यक्ष किसन काळे, राजेंद्र चोरगे, हनुमंत बहिरट आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: पुण्यात पत्नीसह मुलाचा खून करून तरुणाची आत्महत्या

अग्रवाल म्हणाल्या, ‘शहरात उपलब्धतेनुसार लसीचा पुरवठा आणि लसीकरण केंद्र वाढविली जात आहे. लसीकरणामुळे मृत्युदर कमी होत आहे. तसेच पॉझिटिव्ह रेट कमी होत आहे. लसीकरणानंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णांना त्रास कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरणा साठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.' डॉ. आढाव म्हणाले, लस म्हणजे पूर्णपणे बरे होण्याचे औषध नाही. मात्र कोरोनविरोधात प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम लस करते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन काम करावे. सर्वांनी आपल्या घरांची साफसफाई करण्याची मोहीम हाती घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

लसीकरण केंद्रावर प्रथम प्राधान्याने ४५ वर्षांपूढील बाजार घटकांचे लसीकरण केले जात आहे. त्याबरोबर येथे तापीचा दवाखाना सुरू केला असून ताप असल्यास कोरोना तपासणीची सुविधाही उपलब्ध केली आहे.

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

loading image
go to top