esakal | पुण्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

बोलून बातमी शोधा

corona
पुण्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

पुणे- शहरात गुरुवारी (ता.२२) सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात आज ९ हजार १८६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील ४ हजार ८५१ जण आहेत. दरम्यान, जिल्ह्यात दिवसभरात ९ हजार ८४१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. अन्य ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरातील एकूण रुग्णांत शहरातील ४ हजार ५३९ जण आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये २ हजार ५३९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २ हजार २१३, नगरपालिका क्षेत्रात ४१२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १३८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा: Corona Update: राज्यात आज 568 जणांच्या मृत्यूची नोंद; 7 लाख सक्रिय रुग्ण

पुणे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील २ हजार १५६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ७७२, नगरपालिका क्षेत्रातील ३०८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ९९ जण आहेत. आजच्या एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ५६ मृत्यू आहेत. पिंपरी चिंचवडमधील ३२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १४, नगरपालिका हद्दीतील सात आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या २८ हजार ११४ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच ७३ हजार ८०२ जण गृहविलगीकरणात आहेत. आज ४३ हजार १९० कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.