इंदापुरातील कोरोनाबाधित नर्सच्या संपर्कात आलेल्या १८ जणांचा रिपोर्ट...

राजकुमार थोरात
Monday, 13 July 2020

लासुर्णेमधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्सला (परिचारिका) तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तिच्या संपर्कातील आलेल्या हाय-रिस्कमधील १८ जणांचे स्वॅब (घशातील  द्रवाचे नमुने) इंदापूरमधील कोविड सेंटरला देण्यात आले होते. त्याचा अहवाल

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्सच्या संपर्कात आलेल्या १८ जणांपैकी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १७ जणांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला असून, एका चालकचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १७ जणांच्या निगेटिव्ह अहवालामुळे लासुर्णेकरांना दिलासा मिळाला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लासुर्णेमधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्सला (परिचारिका) तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तिच्या संपर्कातील आलेल्या हाय-रिस्कमधील १८ जणांचे स्वॅब (घशातील  द्रवाचे नमुने) इंदापूरमधील कोविड सेंटरला देण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवार (ता. १३) सायंकाळी आला असून, यातील १७ जणांचा अहवाल निगेटिव्ह व एका चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

एकूण १७ जणांच्या निगेटिव्ह अहवालामुळे लासुर्णेकरांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.  रविवारी (ता. १२) पाचपैकी चौघांचा अहवाल निगेटिव्ह व एका नर्सचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. नर्सच्या संपर्कातील २३ पैकी दोघे पॉझिटिव्ह आले आहेत.
 
 Edited by : Nilesh Shende


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of 18 persons from Indapur taluka