esakal | बारामतीकरांची कोरोना लढाई झाली सोपी; उद्यापासून मिळणार `ही` सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

baramati1.jpg

रुई येथील कोविड हेल्थ सेंटरमध्ये संशयित रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते बारामतीतीलच वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी केली जाणार आहे.

बारामतीकरांची कोरोना लढाई झाली सोपी; उद्यापासून मिळणार `ही` सुविधा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती (पुणे) : कोरोनाच्या तपासणीस वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात बारामतीत गुरुवारपासून (ता. 28) प्रारंभ होत आहे. या तपासणीसाठी आवश्यक असलेले आरटीपीसीआर मशीन कार्यान्वित झाले असून बारामतीतूनच आता कोविड 19 चा अहवाल प्राप्त होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांनी ही माहिती दिली.  

पुण्यातल्या शास्त्रज्ञांची आणखी एक भरारी; अवकाशातील दुर्मिळ घटना टिपली!

रुई येथील कोविड हेल्थ सेंटरमध्ये संशयित रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते बारामतीतीलच वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी केली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून ही प्रयोगशाळा बारामतीत कार्यान्वित झाली आहे. 
राज्य शासनाने या प्रयोगशाळा उभारणीसाठी जवळपास दीड कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

ना बॅंण्डबाजा, ना वरात...! लाॅकडाउनमधील लग्नांचा आळंदी पॅटर्न

बारामतीतील आरटीपीसीआर यंत्र कार्यान्वित झाले असून तातडीने आता रिपोर्ट बारामतीतच मिळणार आहेत. दरम्यान बारामतीच्या या प्रयोगशाळेच्या प्रमुख म्हणून सुक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विद्या अर्जुनवाडकर या कामकाज पाहणार असून डॉ. वैशाली डोहे, डॉ.सुजाता कांबळे तसेच डॉ. मंगेश बनकर त्यांना मदत करणार आहेत.

पुणे महापालिकेतील पदाधिकारी महिलेचा कोरोना रिपोर्ट समोर; रिपोर्टमध्ये...

दरम्यान, अजित पवार यांच्या समवेत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैदयकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने व हाफकिन इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश देशमुख तसेच पुण्याच्या बी. जे. मेडीकल कॉलेजचे डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी मदत केल्याचे डॉ. तांबे यांनी सांगितले.

बारावीचा अभ्यासक्रम बदललाय; असे झाले बदल...
 तातडीने रिपोर्ट देण्याचा प्रयत्न...
ज्या दिवशी रुग्णाच्या घशातील द्रवाचा नमुना घेतला जाणार आहे, त्याच दिवशी त्याचा अहवाल देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बारामतीतच तपासणीचा अहवाल मिळणार असल्याने आता पुण्याला जाण्याची गरज भासणार नाही. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

विनामूल्य होणार तपासणी...

दरम्यान, रुई येथील रुग्णालयात संशयित रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने घेतले जाणार असून त्याची तपासणी बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत विनामूल्य केली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांना कसलीही आर्थिक झळ बसणार नाही.