इंदापुरातील नागरिकांना या 19 जणांच्या अहवालामुळे...

डाॅ. संदेश शहा
Friday, 19 June 2020

इंदापूर शहरात मागील 14 दिवसांपासून कोरोनाचा कहर कायम असताना काल (ता. 18) दोन डॉक्टरांसह 19 जणांचे कोरोना अहवाल

इंदापूर (पुणे) : इंदापूर शहरात मागील 14 दिवसांपासून कोरोनाचा कहर कायम असताना काल (ता. 18) दोन डॉक्टरांसह 19 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे इंदापूरकरांना दिलासा मिळाला. 

घाबरू नका, तुमच्यासाठी येथे नोकरी उपलब्ध आहे..

इंदापुरात 17 जून रोजी 45 व 52 वर्षे वयाच्या 2 महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण 19 जणांचे घशातील स्त्रावाचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने तूर्त तरी प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला आहे.

लाॅकडाउनमध्ये 35 कोटींची शेतमाल तारण कर्जे उपलब्ध

कोरोना लागण सुरू झाल्यानंतर इंदापूर शहरात 72 दिवसांनी 6 जून रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळला. त्यानंतर मागील 12 दिवसांत 2 महिला रुग्णांसह शहरात 13 रुग्णांची भर पडली. 17 जून रोजी सापडलेल्या 45 वर्षीय महिला पुणे शहरातील असून, ती इंदापूरमध्ये आपल्या नातेवाईकांकडे आली होती, तर 52 वर्षीय महिला मूळ इंदापूरची असून, ती लग्नासाठी पुणे कोंढवा भागात गेली होती. तिला तेथे लागण झाली. 

ग्रामपंचायतींकडील थकबाकी मुद्रांकमुळे वसूल

या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 2 खासगी डॉक्टरांसह एकूण 19 जणांचे प्रशासनाकडून संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले. तसेच, त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आले होते. 18 जून रात्री सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती उपजिल्हारुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संस्थात्मक विलगीकरणकरण्यात आलेल्या या सर्व 19 जणांचा हा कालावधी संपेपर्यंत त्यांना होमक्वारंटाइन ठेवण्यात येणार असल्याचे तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले. दरम्यान इंदापुरात दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona reports of 19 people in Indapur are negative