पुरंदर : वीर येथील कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

-  गावात फटाके वाजवून केले रुग्णाचे स्वागत      

परिंचे : श्री क्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथे कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पवार यांनी सांगितले. नोबेल रुग्णालयातून रुग्णाला शनिवार (दि.३०) रोजी संध्याकाळी घरी सोडण्यात आले. वीर ग्रामस्थांनी गावात फटाके वाजवून फुले उधळत रुग्णाचे स्वागत केले. रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे गावचे सरपंच माऊली वचकल यांनी समाधान व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संपर्कात आलेल्या नऊ जणांना सासवड येथील कोविड सेंटरमधील अहवाल निगेटिव्ह आला होता. खाजगी लॅबच्या अहवालानुसार पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या अहवालाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले होते. दहा दिवसांनी अहवाल निगेटिव्ह आला मुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वीर येथील संशयित रुग्ण शशिकांत जमदाडे हे नव्यानेच मुंबई पोलिस दलात भरती झाले असून, सांताक्रूझ येथील कलीना कॉलनी मधील रहिवासी आहेत. जमदाडे हे एक महिन्यांपूर्वी ते वीर येथे सुट्टीसाठी आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीने मुंबई येथे बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले. कलीना कॉलनीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने वीर येथील रुग्ण भीतीने खाजगी वाहनातून शनिवारी (दि.१६) तारखेला वीर येथे आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दोन दिवसांनी जमदाडे यांना जुलाब, ताप, घशात खवखव आदी त्रास होऊ लागला. परिचारिका असलेल्या त्यांच्या पत्नीला संशय वाटत असल्याने बुधवार (ता. १९) मे रोजी रुग्ण व त्यांचे भाऊ अभिजित जमदाडे पत्नी योगीता जमदाडे यांनी खाजगी लॅबमध्ये तपासणी केली असता खाजगी लॅबच्या लेखी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांच्या पत्नीला पुण्यातील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. पत्नीसह कोविड सेंटरमध्ये असलेल्या आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. दहा दिवस खाजगी रुग्णालयात जमदाडे यांच्यावर इतर आजारांवर उपचार करण्यात आले. दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जमदाडे यांचा अहवाल निगेटिव्ह आल्या मुळे वीर येथील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. खाजगी रुग्णालयातून जमदाडे  गावात येताच ग्रामस्थांनी फटाके वाजवून फुले उधळत त्यांचे स्वागत केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंधरा दिवस जमदाडे यांना होम क्वारंटाइन राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. गावातील ग्रामस्थांसह शासकीय अधिकाऱ्यांनी मोठे सहकार्य केले असल्याचे योगीता जमदाडे यांनी सांगितले. पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर वीरमध्ये तीन दिवसाचा कडकडीत बंद पाळण्यात आला. बाहेरगावहून आलेल्या नागरिकांना भक्त निवासमध्ये क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सरपंच माऊली वचकल यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्रामपंचायतीच्या वतीने गावात सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले असून गावच्या चार वेशीवर चेक पोस्ट तयार करण्यात आले असल्याचे ग्रामविकास अधिकारी संजय म्हेत्रे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Suspected Patient Corona Reports Negative in Vir Pune