कोरोना संशयिताचा रिपोर्ट निगेटिव्ह आला अन्...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

- वडगाव निंबाळकर येथे मुंबईवरून आलेली एक महिला कोरोनाबाधित आढळली

सोमेश्वरनगर : करंजेपुल (ता. बारामती) येथील कोरोनाची बाधा झाल्याचा संशय असलेला एक रुग्णाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे सोमेश्वरनगर परिसराला दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वडगाव निंबाळकर येथे मुंबईवरून आलेली एक महिला कोरोनाबाधित आढळली होती. या महिलेला वाहनाद्वारे मुंबईतून वडगाव निंबाळकरपर्यंत आणणारा वाहनचालक बारामती येथे आरोग्य विभागाद्वारे क्वारंटाईन करण्यात आला होता. त्याच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. करंजेपुल परिसरातील 15-20 गावांची महत्वाची बाजारपेठ आहे. मागील आठवडाभर पेठ गर्दीने ओसंडून वाहत होती. आधीच मुर्टी येथे आढळलेला रुग्ण या पेठेत खरेदी करून गेल्याचे समजल्याने लोक धास्तावले होते. अशातच सदर कोरोना संशयित चालक करंजेपुल येथेच मोठ्या सोसायटीत राहणारा होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवाय त्याची पत्नी एका कंपनीमध्ये तर त्याचा मुलगा एका किराणा दुकानांमध्ये काम करत होता. यामुळे सदर चालक पॉझिटिव्ह निघण्याच्या भीतीने  परिसर अक्षरशः गॅसवर होता. करंजेपुल, वाणेवाडी या पेठा तीन-चार दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु सुदैवाने तो निगेटीव्ह आल्याने सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला आहे. या अहवालाने सोमेश्वरनगर परिसरात अद्याप एकही संशयित रुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे म्हणाले, सदर करंजेपूल येथील संशयित रुग्ण निगेटीव्ह आला आहे. त्यास बारामती येथे सरकारी व्यवस्थेकडे क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, परिसरात पुणे-मुंबईहून आलेल्या नागरिकांनी चौदा दिवस घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेवक करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Suspected People COVID 19 Report Negative