Corona Virus : पिंपरी चिंचवडमधील 'त्या' तिघांचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह;आज पुन्हा होणार तपासणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

पिंपरी : कोरोना संसर्ग झाल्याने महापालिकेच्या वायसी एम रुग्णालयातील विलागीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या तिघांच्या १४ दिवसांचा कालावधी बुधवारी पूर्ण झाला. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही लॅबमध्ये तपासण्यात आले. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.
 
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज पुन्हा त्यांचे नमुने तपासले जाणार आहेत. त्यांचा अहवालही निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी सोडले जाणार आहेत, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. हे तिघे जन सर्वात अगोदर कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The corona test first report of three patients in Pimpri Chinchwad is negative