esakal | चौदा महिन्यात चाळीस लाख पुणेकरांची कोरोना चाचणी

बोलून बातमी शोधा

कोरोना चाचणी
चौदा महिन्यात चाळीस लाख पुणेकरांची कोरोना चाचणी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आजअखेरपर्यंत जिल्ह्यातील चाळीस लाखांहून अधिक नागरिकांची कोरोना चाचणी (कोविड टेस्ट) करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत एकूण ८ लाख २९ हजार ५०५ जणांना कोरोनाची बाधा ( कोरोना पॉझिटिव्ह) झाल्याचे या चाचणी अहवालातून दिसून आले आहे. यानुसार कोरोना चाचणी घेण्यात आलेल्यांपैकी २०. ७० टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात आज ११ हजार ८७२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत शहरातील ४ हजार ८९५ नवे रुग्ण आहेत. शिवाय ९ हजार ३६७ जण कोरोनामुक्त झाले असून अन्य १६३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये शहरातील ६३ मृत्यू आहेत.

हेही वाचा: बापरे! कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना होतोय नवीनच आजाराचा त्रास

आजअखेरपर्यंत घेण्यात आलेल्या एकूण कोरोना चाचण्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २१ लाख ७ हजार ५९१ चाचण्यांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमधील १० लाख ५८ हजार ६४३, ग्रामीण भागातील ६ लाख ४८ हजार ३४५, नगरपालिका क्षेत्रातील १ लाख ५२ हजार ६६७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३८ हजार ७७३ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

दिवसभरात आढळून आलेल्या नवीन रुग्णांत पिंपरी-चिंचवडमध्ये २ हजार ५१६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ३ हजार ५५४, नगरपालिका हद्दीत ८०५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १०२ नवे रुग्ण सापडले आहेत.

आज पिंपरी चिंचवडमधील ४९, ग्रामीण भागातील ३३, नगरपालिका क्षेत्रातील १३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: पुणेकरांनी मिळकतकरापोटी भरले १७१ कोटी