Corona Virus : खासगी रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्णांची होणार कोरोना तपासणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

शहरातील खासगी रुग्णालयांमधील अतीदक्षता विभागात न्यूमोनियाचे उपचार घेणाऱयांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. न्यूमोनिया होण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. पण, विविध तपासण्यांमधून न्यूमोनियाचे निदान होत नसेल तसेच, रुग्ण औषधोपचांनाही प्रतिसाद देत नसेल तर त्या रुग्णाला आता कोरोनाचा संसर्ग झाला आहे का, याची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, खासगी रुग्णालयांमधून अशा रुग्णांची माहिती संकलित करण्यात येत आहे.

पुणे : शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये न्यूमोनियाच्या उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांची कोरोना विषाणूंच्या संसर्गाची चाचणी करण्यास सुरवात झाली आहे. या संसर्गाचा फैलाव नेमका कुठपर्यंत झाला आहे, ही माहिती संकलनासाठी या तपासण्या सुरू केल्या आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शहरातील खासगी रुग्णालयांमधील अतीदक्षता विभागात न्यूमोनियाचे उपचार घेणाऱयांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. न्यूमोनिया होण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. पण, विविध तपासण्यांमधून न्यूमोनियाचे निदान होत नसेल तसेच, रुग्ण औषधोपचांनाही प्रतिसाद देत नसेल तर त्या रुग्णाला आता कोरोनाचा संसर्ग झाला आहे का, याची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, खासगी रुग्णालयांमधून अशा रुग्णांची माहिती संकलित करण्यात येत आहे.

Corona Virus : पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याचे रिपोर्ट निगेटिव्ह; पुणेकरांना दिलासा!

कोरोना संसर्गाची तपासणी करण्यासाठी आतापर्यंत दोन निकष निश्चित केले होते. त्यातील पहिला निकष म्हणजे, ती व्यक्ती परदेश प्रवास करून आली पाहिजे. आणि दुसरा निकष, संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी ती असावी. महापालिकेच्या नायडू रुग्णालयातून या बाबत घशातील द्रव पदार्थाचा नमूना तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात येत होता. मात्र, कोरोना तपासणी या दोन्ही निकषांमध्ये न बसणारी आणि खासगी रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार घेणारी 41 वर्षीय महिलेला कोरोनाच्या संसर्गाचे निदान झाले. त्यानंतर आता या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय आरोग्य खात्याने घेतला आहे.

आतापर्यंत प्रत्येक रुग्णाला कोरोनाचा संसर्ग कसा झाला, याची माहिती मिळत होती. पण, हा रुग्ण त्याला अपवाद ठरला. त्यामुळे अशा प्रकारेच आणखी काही रुग्ण आहेत का, याचा शोध या माध्यमातून एनआयव्ही घेत आहे, असे आरोग्य खात्यातील अधिकाऱयांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona test will be carried out on Serious patients in private hospitals in pune