esakal | इंदापूर : ...अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल
sakal

बोलून बातमी शोधा

corona

इंदापूर : ...अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : कोरोना महामारीची तिसरी लाट (corona third wave) येवू पहात असून जे नागरिक शासन निर्देशांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सूतोवाच तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी केले. इंदापूर नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजीराजे सभागृहात वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद आयोजित व्यापाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी तहसीलदार श्री. पाटील यांचा नगराध्यक्षा अंकिता शहा तर पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांचा नगरसेवक भरत शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, नगरपरिषद मुख्याधिकारी राम राजे कापरे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, करनिरीक्षकवर्षा क्षीरसागर, श्रद्धा वळीवडे, सुजय मखरे उपस्थित होते.

तहसीलदार पाटील पुढे म्हणाले, 'इंदापूर शहर व ग्रामीण भागात कोरोना वाढत आहे. कोरोना ची दुसरी लाट अंतिम टप्प्यात असून तिसरी लाट येवू घातली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे. इंदापूर हे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती तालुक्याचे ठिकाण असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज आहे मात्र नागरिकांनी त्यास सहकार्य करणे गरजेचे आहे.'

हेही वाचा: ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह होणार सुरु, पण...

नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या, 'कोरोना महामारीत सुरवातीस ८५ दिवसात शहरात एकही कोरोना रुग्ण नव्हता. त्यासाठी सर्वांनी सकारात्मक योगदान दिले होते. त्याप्रमाणे शहरवासीयांनी शासन निर्देश व स्वयंशिस्त पाळून कोरोनावर मात करणे गरजेचे आहे. इंदापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर म्हणाले, कोरोनाची भीती सर्वांना आहे मात्र गेले दीड वर्षांपासून सर्वांचे अर्थकारण ठप्प झाले आहे. त्यामुळे सर्व व्यापारी प्रशासनास योग्य सहकार्य करतील.'

यावेळी धरमचंद लोढा, नरेंद्र गांधी, दत्तात्रय अनपट, राकेश गानबोटे, श्रीनिवास बानकर ,केदार वाशिंबेकर, धीरज शहा, प्रशांत इंगोले, मुन्ना पेडीयार, नितीन कुलकर्णी, राजेंद्र हजारे उपस्थित होते.

loading image
go to top