esakal | पुणेकरांना दिलासा; ‘घरबंदी’मुळे रुग्णसंख्या आटोक्यात

बोलून बातमी शोधा

Pune Weekend Lockdown

पुणे महापालिकेत गेल्या दोन आठवड्यांपासून सरासरी रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांच्या विश्लेषणातून स्पष्ट होते.

पुणेकरांना दिलासा; ‘घरबंदी’मुळे रुग्णसंख्या आटोक्यात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाबाधितांचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. पुण्यात ५ ते ११ एप्रिल या आठवड्यात सर्वाधिक रुग्णसंख्या होती. ती आता कमी होत असल्याचे दिसते. निर्बंध वाढल्याने शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

पुण्यात ११ फेब्रुवारीनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य खात्याने नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत गेल्या दोन आठवड्यांपासून सरासरी रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांच्या विश्लेषणातून स्पष्ट होते.

हेही वाचा: मासिक पाळी, गर्भवती, स्तनपान आणि लसीकरण; दूर करा गैरसमज

पुण्यात गेल्या मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाच हजार ६२८ रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान झाले होते. ही संख्या अवघ्या पाच आठवड्यांमध्ये ३४ हजार रुग्णांनी वाढली. ५ ते ११ एप्रिल या आठवड्यात ३९ हजार ७१७ पर्यंत नोंदली गेली. ही गेल्या दोन महिन्यांमधील आठवड्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचे दिसते.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुण्यात एप्रिलच्या मध्यानंतर निर्बंधात वाढ करण्यात आली. त्यामुळे शहरातील गर्दीच्या ठिकाणे ओस पडली. रस्त्यांवरील रहदारी कमी झाली. याचा थेट परिणाम रुग्णसंख्या कमी होण्यावर झाला. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी एकमेकांशी येणारा संपर्क कमी होणे महत्त्वाचे असते. गर्दीच्या ठिकाणी हा संसर्ग सहजतेने होतो. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचे ठरते. मात्र वारंवार आवाहन करूनही रस्त्यांवरील गर्दी कमी होत नव्हती. त्यामुळे निर्बंध कडक करणे अनिवार्य ठरले. त्याचा परिणाम आत दोन आठवड्यानंतर दिसत असल्याचेही सार्वजनिक आरोग्य खात्यातील तज्ज्ञांनी सांगितले.