esakal | Corona Update: पुणेकरांनो! कोरोनामुक्तांची संख्या वाढली; मात्र, काळजी घ्या!

बोलून बातमी शोधा

Corona Update: पुणेकरांनो! कोरोनामुक्तांची संख्या वाढली; मात्र, काळजी घ्या!
Corona Update: पुणेकरांनो! कोरोनामुक्तांची संख्या वाढली; मात्र, काळजी घ्या!
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.२१) सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे. पुणे शहरातही मागील तीन दिवसांपासून सातत्याने कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात ११ हजार १७४ तर, पुणे शहरात ६ हजार ५३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात १० हजार ९०२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसातील एकूण रुग्णांत शहरातील ५ हजार ५२९ जण आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आज १२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुणे शहरातील ५६ मृत्यू आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ३२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २२, नगरपालिका हद्दीत सात आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील २ हजार ३७६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ७३५, नगरपालिका क्षेत्रातील ४३३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १००

हेही वाचा: 22 एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन; असे असतील नवे निर्बंध

जण आहेत. आजच्या एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील २ हजार ३८५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ हजार ३१५, नगरपालिका हद्दीतील ४८० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १९३ रुग्ण आहेत. जिल्ह्यात सध्या २७ हजार ७६५ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच ७३ हजार ६११ जण गृहविलगीकरणात आहेत. आज ४२ हजार ७८३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.