esakal | 22 एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन; असे असतील नवे निर्बंध

बोलून बातमी शोधा

null

22 एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन; असे असतील नवे निर्बंध

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावला जाईल, मात्र त्याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच करतील, अशी माहिती काल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानुसार, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधन करतील अशी अपेक्षा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांचं हे संबोधन आणि लॉकडाऊनचा निर्णय लांबणीवर पडलं आहे. नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्या घटनास्थळी भेट देतील आणि त्यानंतर जनतेला संबोधन करतील, अशी माहिती मिळत आहे. मात्र, राज्यात उद्या 22 एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून नवे निर्बंध लागू होणार आहेत. आधीच्या नियमांहून हे नियम अधिक कडक असणार आहेत.

याआधी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं की, लॉकडाउनबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला आहे. सर्वच मंत्र्यांची तशी मागणी आहे. मात्र परिस्थिती ओळखून सध्यातरी कडक निर्बंधांचे आदेश दिले आहेत. लॉकडाउन करणं गरजेचं आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच याबाबतची माहिती देतील. जिल्हाबंदी होणार नाही, पण विनाकारण फिरणाऱ्यांना रोखलं जाईल, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

हेही वाचा: पुणे जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिव्हीरचा पुरवठा; मात्र पुरेशा पुरवठ्याअभावी रुग्णांचे हाल

null

null

null

null

null

हेही वाचा: नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती; रुग्णांना इतरत्र हलवले

ब्रेक दि चेनची अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे असतील -

  • लग्न समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंड

  • लग्नात फक्त 25 लोकांना परवानगी. एकाच हॅालमध्ये 2 तास कार्यक्रम

  • आंतरजिल्हा प्रवास फक्त महत्त्वाच्या कारणांसाठी

  • मुंबईत खासगी गाडीत प्रवास 50 टक्के क्षमतेने

  • सरकारी कार्यालय 15 टक्के क्षमतेने सुरु

  • खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु

  • लोकल ट्रेनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश. आयकार्ड तपासून तिकिट मिळेल

  • खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक लोकांसाठीच

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर

दरम्यान, नाशिक शहरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती झाल्याने एकूण 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. ऑक्सिजनच्या टाकीच्या वॉलमधून लिकेज झाल्यामुळे प्रेशर कमी झाले आणि 24 व्हेंटीलेटेड पेशंट मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाच्या हवाल्याने दिली आहे. राज्यात सध्या ६ लाख ८५ हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी १५ टक्के लोकांना ऑक्सिजनची गरज भासू शकते. आतापर्यंत आपल्याकडे १ हजार ५५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. आम्ही तेच वितरीत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारत सरकार ऑक्सिजनची आयात करेल, याची अपेक्षा आम्ही करत आहोत, असंही टोपे म्हणाले.