
पुणे जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ४ हजार ३४८ नवे कोरोना रुग्ण
पुणे : पुणे जिल्ह्यात शनिवारी (ता.८) दिवसभरात ४ हजार ३४८ नवे कोरोना रुग्ण (Corona Patient) आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील २ हजार ४७१ जण आहेत. अन्य दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू (Corona Death) झाला आहे. हे दोन्ही कोरोना मृत्यू पुणे शहरातील आहेत.
यामुळे जिल्ह्यातील आज अखेरपर्यंतच्या एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही १८ हजार ८५७ झाली आहे. एकूण सक्रिय रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये १ हजार ३२६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अन्य १७ हजार ५३१ जण गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील १ हजार ७३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५७८, नगरपालिका हद्दीतील १५१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ७५ रुग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा: सख्ख्या चुलतभावाकडून चाकू व कोयत्याने वार; एकजण गंभीर जखमी
दरम्यान, दिवसभरात ८६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसातील कोरोनामुक्तांत पुणे शहरातील ७११, पिंपरी चिंचवडमधील ४३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७२, नगरपालिका हद्दीतील ११ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २८ जण आहेत. दिवसभरात एकूण ३४ हजार ५२४ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या चाचण्यांमध्ये पुणे शहरातील १९ हजार १८६ चाचण्यांचा समावेश आहे.
Web Title: Corona Updates Pune District And City
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..