esakal | पुण्यात आजही लसीकरण बंद

बोलून बातमी शोधा

Vaccination

पुण्यात आजही लसीकरण बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तेसवा

पुणे : सरकारकडून लस(Vaccine) उपलब्ध झालेली नसल्याने मंगळवारी (ता. ४) ४५ ते पुढील वयोगटासाठी लसीकरण(vaccination) होणार नसल्याचे महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सलग चौथ्या दिवशी केंद्र (vaccination center) बंद राहिल्याने नागरिक हवालदील झाले. आरोग्य सेवक(Health worke), फ्रंट लाइन कर्मचारी(Frontline staff), ४५ वयापुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. आत्तापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून ८ लाख ३८ हजार लसीकरण झाले आहे. त्यापैकी सुमारे ५ लाख नागरिक दुसऱ्या डोससाठी अपेक्षीत आहेत. ज्यांनी पहिला डोस घेऊन आता दुसरा डोस घेणे आवश्‍यक आहे अशांना प्राधान्य दिले जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले होते. (corona Vaccination is still closed on Tuesday in Pune)

सोमवारी सरकारकडून पालिकेला लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला. पण त्यांना लस मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील ४५ ते पुढील वयोगटासाठीचे लसीकरण बंद असणार असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा: रात्रीतून लस उत्पादन वाढ अशक्य; आदर पूनावाला

‘आम्हाला फोन ही करू नका’
लसीकरण वेगात करण्यासाठी नागरिक, नगरसेवकांचा महापालिका प्रशासनावर प्रचंड दबाव येत आहे. त्यामुळे पालिकेचे अधिकारी सरकारच्या आरोग्य विभागाच्या संपर्कात आहे. लस कधी मिळणार?, आज किती डोस पाठविणार अशी चौकशी पालिकेचे अधिकारी करत आहेत. मात्र, आम्हाला लस कधी येईल म्हणून सतत विचारणा करून नका? फोन देखील करू नका. जेव्हा येईल तेव्हा आम्ही संपर्क साधू असे उत्तरे मिळत असल्याने पालिकाही हतबल झाली आहे.

हेही वाचा: कोरोनानंतर नाकात होतोय बुरशीजन्य आजार; दुर्मिळ रोगावरील उपचारांसाठी ‘एसओपी’


अशी आहे स्थिती
- गेल्या आठवड्याभरापासून पुरेशा प्रमाणात लसच उपलब्ध नाही
- दुसरा डोस घेणे आवश्यक असणाऱ्यांच्या संख्येत वाढ
- दुसरीकडे १८ वर्षांपुढील नागरिकांच्या संख्येत वाढ
- प्रशासनात गोंधळाचे वातावरण
- तुटवडा निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये लस मिळणार की नाही याबाबत चिंता

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा